एक्स्प्लोर
आयएनएस विक्रमादित्यवर आग, धुरात गुदमरुन नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू
आयएनएस विक्रमादित्यवर लागलेल्या आगीमुळे पसरलेल्या धुराचा त्रास होऊन लेफ्टनंट कमांडर डी. एस. चौहान बेशुद्ध झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला
मुंबई : भारतीय नौदलातील युद्धनौका आयएनएस विक्रमादित्यवर आग लागली होती. आगीवर नियंत्रण मिळवण्यात काही वेळात यश आलं मात्र धुरात गुदमरुन एका नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू झाला.
आयएनएस विक्रमादित्य ही भारतीय नौदलाची नौका आज सकाळी कारवार बंदरात प्रवेश करत असताना तिला आग लागली. जहाजावरच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित हालचाली करत आग आटोक्यात आणल्यामुळे जहाजाचं कोणतंही नुकसान झालं नाही.
लेफ्टनंट कमांडर डी. एस. चौहान यांच्या नेतृत्वाखाली चमूने आग विझवली. मात्र आगीमुळे पसरलेल्या धुराचा त्रास होऊन लेफ्टनंट कमांडर डी. एस. चौहान बेशुद्ध झाले. त्यांना कारवार येथील आएनएचएस पतंजली या नौदलाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
It is with profound grief & regret that we report the sad & untimely demise of Lieutenant Commander DS Chauhan, a young colleague and a brave brother-in-arms, onboard INS Vikramaditya. He laid down his life fighting a fire in a machinery compartment 1/3 pic.twitter.com/E2NUPJtSFK
— SpokespersonNavy (@indiannavy) April 26, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement