(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PM Modi Mumbai Visit : पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यासाठी वाहतुकीत बदल, ईस्टर्न फ्री वे बंद, 'हे' आहेत पर्यायी मार्ग!
Narendra Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत येणार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी वाहतुकीच्या काही मार्गात बदल केला आहे.
PM Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज मुंबईत (Mumbai) येणार असून त्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी (Mumbai Police) काही मार्गात बदल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सीएसटीएम स्थानकावरुन वंदे भारत एक्स्प्रेसला (Vande Bharat Express) हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाला मुंबई तसेच इतर भागातून बरीच गर्दी होण्याची शक्यता आहे. पूर्व द्रुतगती मार्ग, पी.डीमेलो रोड, शहीद भगतसिंग रोड तसेच कार्यक्रमस्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दुपारी 2.45 ते 4.15 पर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मरोळमध्ये कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमांच्या ठिकाणी गर्दी होणार आहे. त्यामुळे पूर्व द्रुतगती मार्ग, पी. डिमेलो रोड, शहीद भगतसिंग रोड आणि कार्यक्रमस्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दुपारी पावणेतीन ते सव्वा चार वाजेपर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. ईस्टर्न फ्री वे मार्गावरची वाहतूक बंद करुन, ती डी एन रोड आणि जे जे ब्रिजवर वळवण्यात आली आहे. त्यामुळे वाशीहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाण्यासाठी वाहनांनी ईस्टर्न फ्री वे मार्गाचा वापर न करता पूर्व द्रुतगती मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कुलाब्यातल्या बधवर पार्क, कफ परेड आणि नेव्ही नगरची वाहतूक मंत्रालयाकडून वळवण्यात आली आहे.
असा आहे वाहतुकीतील बदल
इस्टर्न एक्सप्रेस
पूर्व द्रुतगती मार्ग, पी.डीमेलो रोड, शहीद भगतसिंग रोड तसेच कार्यक्रमस्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दुपारी 2.45 ते 4.15 पर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. इस्टर्न फ्री वे मार्गावरची वाहतूक बंद करून डी एन रोड आणि जे जे ब्रिजने वाहतूक वळवली आहे. वाशीहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या वाहनांनी इस्टर्न फ्री वे मार्गाचा वापर न करता पूर्व द्रुतगती मार्गाचा वापर करावा. बधवर पार्क, कफ परेड, नेव्ही नगरची वाहतूक ही मंत्रालयाकडून वळवण्यात आली आहे.
वेस्टर्न एक्सप्रेस
अंधेरी, घाटकोपर-कुर्ला रोड या दोन्ही वाहिन्यांवरील मरोळ नाक्याच्या दिशेने येणारी वाहने साकीनाका जंक्शन येथून साकी विहार रोडने मिलिंद नगर एल. अॅन्ड टी. गेट नं. 8 येथून डावे वळण घेउन जे. व्हि. एल. आर. रोडने पश्चिम द्रुतगती महामार्गाकडे मार्गस्थ होतील.
अल जामिया युनिव्हर्सिटीचे उद्घाटन, मुंबई पोलिसांचा तगडा बंदोबस्त
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि पोलिसांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुंबईच्या अंधेरी पूर्वेत मरोळ परिसरामध्ये बोहरा मुस्लिम समाजाकडून उभारण्यात आलेली अल जामिया युनिव्हर्सिटीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांकडून जवळपास 1000 पोलिसांचा ताफा तैनात करण्यात येणार आहे. यात मुंबई पोलिसांचे पाच डीसीपी, 200 अधिकारी, 800 अंमलदार बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा कसा असेल?
- पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी 2.10 मिनिटांनी मुंबई विमानतळावर दाखल होतील.
- मुंबई विमानतळावरुन हेलिकॉप्टरने आयएनएस शिक्रावर येणार
- दुपारी 2.45 वाजता सीएसएमटी स्थानकावर पोहोचतील.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी प्लॅटफॉर्म 18 वर दोन मिनिटांसाठी चालत वंदे भारत एक्स्प्रेसकडे जाणार आहेत.
- वंदे भारतमध्ये लहान मुलांसोबत 7 मिनिट मोदी गप्पा मारतील
- वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवतील, साधारणत: 3 मिनिटांचा हा कार्यक्रम असेल
- यासंदर्भात 1 मिनिटांचं प्रेझेंटेशन मोदींना दिलं जाईल.
- सीएसएसटी रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म नंबर 18 वरती हा साधारणत: 15 मिनिटांचा हा कार्यक्रम असेल
- प्लॅटफॉर्म 18 वरुन वाहनाच्या दिशेने 2 मिनिटात पोहोचतील आणि तिथून आयएनएस शिक्रावर दाखल होतील
- पुन्हा 3.55 ला सीएसएमटीवरुन आयएनएस शिक्रावर दाखल होतील. पुन्हा हेलिकॉप्टरने मुंबई विमानतळाच्या दिशेने रवाना होतील.
- दुपारी 4.20 मिनिटांनी मुंबई विमानतळ दाखल होतील.
- मुंबई विमानतळ ते मरोळ कारने जाणार आहेत.
- मरोळ येथील कार्यक्रमाला 4.30 वाजता पोहोचतील,
- ऑल झकेरिया ट्रस्ट सैफी नवीन कॅम्पसचं उद्घाटन होईल.
- मोदी 5.50 वाजता मरोळहून कारने मुंबई विमानतळावर जाणार आहेत.
- सहा वाजता मुंबई विमानतळावरुन दिल्लीच्या दिशेने रवाना होणार आहेत.
VIDEO : PM Narendra Modi Mumbai Daura : पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या दौऱ्यामुळे मुंबईत वाहतुकीत हे बदल
ही बातमी वाचा: