एक्स्प्लोर
Advertisement
नारायण राणेंच्या नव्या पक्षाची स्थापना 1 ऑक्टोबरला : सूत्र
नारायण राणेंना महसूल खातं मिळू शकतं अशी माहिती सुत्रांकडून समजते आहे. तसेच राणेंचा शपथविधी 6 ऑक्टोबरला होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
मुंबई : काँग्रेसचा राजीनामा दिलेले ज्येष्ठ नेते नारायण राणे १ ऑक्टोबरला आपल्या नव्या पक्षाची स्थापना करणार असल्याची माहिती सुत्रांकडून समजते आहे. त्यामुळे आता राणे भाजपमध्ये न जाता स्वत:चा वेगळा मार्ग निवडण्याची शक्यता आहे.
मात्र, असं असलं तरीही नारायण राणेंचा हा पक्ष एनडीएला पाठिंबा देणार असल्याचीही माहिती मिळते आहे. दरम्यान, या मोबदल्यात नारायण राणेंना एक महत्त्वाचं खातंही मिळणार आहे.
नारायण राणेंना महसूल खातं मिळू शकतं अशी माहिती सुत्रांकडून समजते आहे. तसेच राणेंचा शपथविधी 6 ऑक्टोबरला होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या विस्तारामध्ये राणेंना कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याचीही चिन्हं आहेत. राणेंचे पुत्र नितेश राणे यांची ‘स्वाभिमान’ संघटना कोकणात तळागाळात पसरली आहे. त्याचा आधार घेत नव्या पक्षा पाळंमुळं रोवण्याचा राणेंचा प्रयत्न असेल.
दरम्यान, दसऱ्यापर्यंत आपण आपली पुढची वाटचाल स्पष्ट करु असं राणेंनी कुडाळमधील पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. त्यानंतर राणेंनी दिल्लीत जाऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेटही घेतली होती. पण या भेटीत राणेंच्या भाजप प्रवेशावर फार काही चर्चा झाली नाही.
संबंधित बातम्या :
बाळसाहेबांना उद्धव ठाकरेंएवढा त्रास कुणीही दिला नाही : राणे
नारायण राणेंचा नवा पक्ष लवकरच, एनडीएत सहभागी होणार?
नारायण राणे पुढची वाटचाल 1 ऑक्टोबरला जाहीर करणार!
राणे-शाहांच्या बैठकीत नेमकं काय काय झालं?
हॉस्पिटलच्या उद्घाटनाचं आमंत्रण देण्यासाठी राणे दिल्लीत : दानवे
राणेंकडे रिमोट कंट्रोल, तेच विरोधीपक्षनेता ठरवणार : नितेश राणे
माझे बॉस नारायण राणे, त्यामुळे मला भीती नाही: नितेश राणे
माझ्या घरात दोन आमदार, राज ठाकरेंच्या पक्षाचा एकच आमदार : राणे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement