एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नारायण राणेंचा मंत्रिमंडळात समावेश होणारच : सूत्र
काँग्रेस आमदार आणि राणेंचं पुत्र नितेश राणेंनी आज ‘वर्षा’वर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी नितेश राणे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशाविषयी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून समजते आहे.
मुंबई : शिवसेनेच्या विरोधानंतरही नारायण राणेंचा एनडीए प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे. नारायण राणेंच्या एनडीए प्रवेशासाठी जोरदार राजकीय हालचाली सुरु असल्याचं दिसतं आहे.
काँग्रेस आमदार आणि राणेंचं पुत्र नितेश राणेंनी आज ‘वर्षा’वर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी नितेश राणे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशाविषयी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून समजते आहे.
शिवसेना मात्र राणेंना एनडीएमध्ये न घेण्यावर ठाम असल्याची माहिती मिळती आहे. मात्र, मुख्यमंत्री राणेंना सामावून घेण्यावर ठाम आहेत.
दरम्यान, शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी याविरोधात राणे आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. ज्यांच्या विरोधात ईडीनं आरोपपत्र दाखल केलं आहे अशांना मंत्रिमंडळात कसं घेता? असा सवाल शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भाजपला केला आहे.
‘राणेंना मंत्रिमंडळात स्थान दिल्यास शिवसेनेला गंभीर विचार करावा लागेल’, असा उद्धव ठाकरेंचा निरोप मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याची बातमी काल आली होती. मात्र तरीही भाजप राणेंच्या मंत्रिमंडळ समावेशावर ठाम आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात नेमकं काय होणार? याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
दरम्यान, मंत्रिमंडळात शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांचा कोटा आहे. भाजपच्या कोट्यातून नारायण राणेंना मंत्रिमंडळावर घेतलं जाणार असल्याने शिवसेनेच्या विरोधाचा प्रश्न उरणार नसल्याचं म्हटलं जातं. शिवाय, नारायण राणेंना शिवसेनेचा विरोध जुनाच आहे.
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर नारायण राणेंनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली आणि ते एनडीएत दाखल झाले.
संंबंधित बातम्या :
ईडीनं आरोपपत्र दाखल केलेले राणे मंत्रिमंडळात का? : शिवसेना
सत्ता भाजपच्या मालकीची, आम्ही नावापुरते : संजय राऊत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement