एक्स्प्लोर

Mumbai University: सिनेट निवडणुकीसाठी ठाकरे गट पुन्हा आक्रमक! आशिष शेलारांच्या तक्रारीमध्ये तथ्य नाही; ठाकरे गटाचा दावा

Mumbai University: सिनेट निवडणुकांसंदर्भात आशिष शेलारांनी केलेल्या तक्रारीमध्ये तथ्य नसल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. सिनेट सदस्यांनी याबाबत आज विद्यापीठातील कुलगुरुंची भेट घेऊन पत्र सोपावलं आहे.

मुंबई: मुंबई विद्यापीठाने पदवीधर मतदारसंघासाठी जाहीर करण्यात आलेली सिनेट निवडणूक (Senate Election) पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित केली आहे. सिनेट निवडणुकीसाठीच्या अंतिम मतदार यादीमधील मतदारांच्या नावांमध्ये तफावत असल्याची तक्रार भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली होती. यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. सिनेट निवडणुकांसंदर्भात आशिष शेलारांनी केलेल्या तक्रारीमध्ये तथ्य नसल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे.

ठाकरे गटाकडून तक्रारीवर स्पष्टीकरण

भाजपकडून मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) सिनेट निवडणुकीसंदर्भात तक्रार करण्यात आली. मतदार यादीत एकाच मतदाराची नावं दोन ते तीन वेळेस आल्याची तक्रार आशिष शेलार यांनी केली. मात्र अंतिम मतदार यादीमध्ये उमेदवारांची कुठल्याही प्रकारे दोनदा किंवा तीनदा नावं आलेली नाहीत, प्रत्यक्षात एकाच नावाचे दोन मतदार हे वेगवेगळे मतदार आहेत, असा दावा ठाकरे गटाने केला आहे.

सिनेट निवडणुका लावण्याची ठाकरे गटाची मागणी

मतदार यादीत मतदारांची दोन-तीन वेळा नावं आल्याची तक्रार भाजप नेते आशिष शेलारांनी केली, तसं पत्र त्यांनी राज्य सरकारला दिलं होतं. त्यानंतर अंतिम आदेश येईपर्यंत या निवडणुकांना स्थगिती देण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या. मात्र मतदार यादीची 3 वेळा पडताळणी झाली असल्याचं ठाकरे गटाने स्पष्ट केलं आहे. युवासेना पदाधिकारी आणि सिनेट सदस्यांनी मुंबई विद्यापीठात कुलगुरुंची भेट घेऊन याबाबतचं पत्र देखील त्यांच्याकडे सोपावलं आहे. त्यामुळे आता कारणं शोधणं सोडा आणि निवडणुका लावा, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.

असा होता निवडणुकीचा कार्यक्रम

सिनेटची निवडणूक 10 सप्टेंबर रोजी होणार होती. सिनेट निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 18 ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत होती. तर उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया 21 ऑगस्ट रोजी निश्चित करण्यात आली होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ही 25 ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत ठेवण्यात आलेली. तर 28 ऑगस्ट रोजी उमेदवारांची यादी जाहीर होणार होती. 10 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सिनेट निवडणुकीसाठी मतदान आणि 13 सप्टेंबर रोजी या निवडणुकांचा निकाल जाहीर केला जाणार होता. 

आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीला स्थगिती दिल्याने राजकीय पक्षांसोबतच विद्यार्थी संघटना नाराज झाल्या आहेत, तर  विरोधक देखील  आक्रमक झाले आहेत. सिनेट निवडणूक स्थगित झाल्यावरून आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (CM Eknath Shinde) सडकून टीका केली. स्थानिक आणि लोकसभा निवडणुकीप्रमाणे मुख्यमंत्री सिनेट निवडणुकीला देखील घाबरले, असा टोला आदित्य ठाकरे  यांनी लगावला आहे.

'सिनेट तुमचं सरकार पाडणार नाही, आम्हीच तुमचं सरकार पाडणार'

दोन पक्ष फोडले, दोन परिवार फोडले आणि आता महाशक्ती सोबत असूनही निवडणुकीला घाबरतात का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना केला. लोकसभेला देखील असंच करण्याची शक्यता आहे, लोकसभेला देखील निवडणुका जाहीर करतील आणि मग स्थगित करतील, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. सिनेट तुमचं सरकार पाडणार नाही, तर आम्हीच तुमचं सरकार पाडणार आहोत, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

हेही वाचा:

Mumbai University : पदवीधर मतदारसंघाच्या सिनेट निवडणुकीवर स्थगिती का? मुंबईने विद्यापीठाने स्पष्ट सांगितलं...

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव याचं निधन
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव याचं निधन
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना

व्हिडीओ

Nitesh Rane Majha Vision : महायुतीमधील वाद, भावासोबतचं भांडण; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा
Bhaskar Jadhav : आदित्य ठाकरेंसाठी एका क्षणात विरोधी पक्षनेतेपदाचा त्याग करणार: भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले?
Majha Vision vijay Wadettiwar : जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही, वडेट्टीवारांची स्फोटक मुलाखत
Nilesh Rane-Ravindra Chavan : रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे समोरा-समोर, विधानभवनात काय घडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव याचं निधन
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव याचं निधन
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
Priyanka Gandhi: मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
Embed widget