एक्स्प्लोर

Mumbai University : पदवीधर मतदारसंघाच्या सिनेट निवडणुकीवर स्थगिती का? मुंबईने विद्यापीठाने स्पष्ट सांगितले...

Mumbai University Senate Election : मुंबई विद्यापीठाने सिनेट निवडणुकीवर स्थगिती का दिली, याचे कारण स्पष्ट केले आहे.

मुंबई:  मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवर (Mumbai University Senate Election) गुरुवारी प्रशासनाने अचानकपणे स्थगिती दिल्याने एकच गोंधळ उडाला. मुंबई विद्यापीठाने (University Of Mumbai) घेतलेल्या या निर्णयामुळे जवळपास सगळ्याच विद्यार्थी संघटना संतप्त झाल्या. आज ठाकरे गट युवा सेना, छात्र भारती, सम्यक विद्यार्थी संघटना, मनविसे आदी संघटनांनी नाराजी व्यक्त केली. विद्यापीठाने अचानक निर्णय घेतल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर आता, मुंबई विद्यापीठाने निवेदन जारी करत सिनेट निवडणुकीला स्थगिती का दिली, याची माहिती दिली आहे. 

मुंबई विद्यापीठाने काय म्हटले?

मुंबई विद्यापीठाचे पत्र काढून या सर्व सिनेट निवडणुकीच्या स्थगितीवर स्पष्टीकरण दिले आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, 2016 मधील कलम 28 (2) (न) मधील तरतूदीनुसार अधिसभेवर 10 नोंदणीकृत पदवीधर निवडून देण्याची तरतूद आहे. या अनुषंगाने सर्व संबंधिताना कळविण्यात आले होते. दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अंतिम मतदार यादी (सुधारीत) प्रसिद्ध करण्यात आली होता. दिनांक 17 ऑगस्ट 2023 रोजी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून विद्यापीठास अंतिम मतदार यादी (सुधारीत) यामध्ये काही विसंगती असल्याबाबतची तक्रार प्राप्त झाल्याचे कळविण्यात आले. 

सदर विसंगतीची तात्काळ सखोल चौकशी करून त्याच दिवशी अहवाल सादर करण्यास कळविले व त्या अनुषंगाने विद्यापीठाने मतदार यादीतील मतदारांची मोठी संख्या पाहता विसंगतीबाबत तात्काळ कार्यवाही करणे शक्य होणार नाही, तसेच याबाबत योग्य ती सखोल चौकशी करण्याकरीता विद्यापीठास वेळ आवश्यक असल्याने शासनाने विद्यापीठास योग्य ते मार्गदर्शन करण्याची विनंती करण्यात आली. 

त्याअनुषंगाने शासनाकडून प्राप्त झालेल्या पत्रामध्ये मतदार यादीबाबत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने सर्व कागदपत्रांची सखोल तपासणी होऊनच निवडणूक प्रक्रिया होणे आवश्यक असल्याने मतदार यादी सुधारीत करून निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्याबाबत विद्यापीठाला निर्देश दिले. 

या निर्देशाच्या अनुषंगाने विद्यापीठाने दिनांक 17 ऑगस्ट 2023 रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत झालेल्या ठरावानुसार पुढील आदेशापर्यंत निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्याचे दिनांक 17 ऑगस्ट 2023 रोजी परिपत्रक निर्गमित केले. पुढील निवडणूक प्रक्रियेबाबत वेळोवेळी विद्यापीठ निवडणूक विभागाच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे मुंबई विद्यापीठाने म्हटले. 

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीला स्थगित दिल्याने राजकीय पक्ष त्यासोबतच विद्यार्थी संघटना नाराज झाल्या आहेत. 9 ऑगस्ट रोजी सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम मुंबई विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आला होता. 10  सप्टेंबरला निवडणूक आणि 13 सप्टेंबरला निकाल, असा हा कार्यक्रम होता.

भाजपचे आशीष शेलार यांचे मतदार यादीवरून प्रश्न 

दरम्यान, सिनेट निवडणुकीसाठीच्या अंतिम मतदार यादीमधील मतदारांच्या नावांमध्ये तफावत असल्याची तक्रार भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली होती. तसे त्यांनी एक पत्र राज्य सरकारला दिलं होतं. त्यानंतर अंतिम आदेश येईपर्यंत या निवडणुकांना स्थगिती देण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या. 

इतर महत्त्वाच्या बातम्या: 

एबीपी माझा या वृत्तवाहिनीमध्ये आणि पत्रकारिता क्षेत्रात गेली अकरा वर्षापासून कार्यरत आहेत. एबीपी माझा या वृत्तवाहिनीमध्ये सध्या "मुंबई ब्युरो चीफ" या पदावर कार्यरत आहे. या मागील अकरा वर्षाच्या कार्यकाळात राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील विविध प्रश्न आपल्या बातमीद्वारे महाराष्ट्रतल्या जनतेसमोर मांडत आहे. 

प्रत्येक विषयाची, बातमीची योग्य पद्धतीने मांडणी करून आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आपल्या बातमीची  छाप कशी पडेल आणि लोकांपर्यंत ती सहज त्यांना समजेल अशा भाषेत कशी जाईल यासाठी प्रयत्नशील आहे. 

छत्रपती संभाजी नगर हे मूळ गाव असून पहिली ते पदवीच शिक्षण करून पुणे विद्यापीठातून मास्टर ऑफ कम्प्युटर अप्लिकेशन (MCA) पूर्ण करत पदव्युत्तर शिक्षण घेतल. पदव्युत्तर शिक्षण आयटी क्षेत्रात घेतल्यानंतर  आपल्या आवडीच्या पत्रकारिता क्षेत्रात मुंबईच्या झेवीयर्स महाविद्यालयामध्ये पत्रकारिता डिप्लोमा कोर्स आणि त्यानंतर पत्रकारितेत सुद्धा एम ए (मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम ) छत्रपती संभाजी नगर -डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा विद्यापीठातून पूर्ण केला 

एबीपी माझामध्ये 2016 पासून काम करत आहे. 2019,2024 लोकसभा विधानसभा निवडणुका, पक्ष फुटी पासून ते सत्तांतराच्या बातम्या अगदी जवळून कव्हर केल्या, शिक्षण क्षेत्रात मुंबई विद्यापीठाचा गोंधळ, विद्यार्थी शिक्षकांचे प्रश्न, शिक्षण क्षेत्रातल्या रोजच्या घडामोडी इथपासून ते शिक्षक विद्यार्थी आंदोलनतले प्रश्न, दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेलं विद्यार्थ्यांचा आंदोलन असे अनेक विद्यार्थ्यांच्या युवांच्या निगडित घडामोडी, त्यांचे प्रश्न मांडण्याचे काम करत आहे 

विधानसभा निवडणुकीत 'पोस्टमन माझा' सारखा 'एबीपी माझा' वृत्तवाहिनीच्या विशेष कार्यक्रमात आपल्या करेक्टर रिपोर्टिंगद्वारे विविध मतदार संघातील मतदारांचे प्रश्न स्थानिक आमदार, राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मांडले. महानिर्वाणदिनी भीमगीत गायिका सुषमादेवी यांचा काळाच्या पडद्याआड गेलेला  बुलंद आवाज महाराष्ट्रसमोर आणला. 

कोरोना काळात शोध पत्रकारितेतून कोरोना रुग्णांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत "ऑपरेशन लुटारू" या स्टिंग ऑपरेशनच्या मालिकेतून बेड पासून रुग्णवाहिकेसाठी, कोरोना टेस्टसाठी कशी लूट केली जाते अश्या अनेक गोष्टी सरकार समोर मांडल्या. 

आतापर्यंत केलेल्या कामाबद्दल खालील पुरस्कार प्रदान करण्यात आले 

राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणारा महाराष्ट्र शासन पु.ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार -2019

ईएनबीए राष्ट्रीय पुरस्कार 2019

राज्यस्तरीय युवा पत्रकार संघ पुरस्कार 2024 

सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कार 2026

सन्मान देवदूतांचा पुरस्कार 2021

श्रेष्ठ सन्मान एबीपी माझा पुरस्कार 2019

चौथा स्तंभ राज्यस्तरीय विशेष पत्रकारिता पुरस्कार 2019

श्रेष्ठ सन्मान एबीपी माझा पुरस्कार 2019

Read More

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
हीच लोक एका पराभवाने सैरभैर होऊन लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत; कॅबिनेटचा निर्णय, 'गोकुळ'वरुन आव्हाडांचा संताप
हीच लोक एका पराभवाने सैरभैर होऊन लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत; कॅबिनेटचा निर्णय, 'गोकुळ'वरुन आव्हाडांचा संताप

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
धर्मरक्षणासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत समर्पित राहणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
सत्तेपेक्षा सिद्धांत मोठा, अधिकारापेक्षा धर्म आणि कर्तव्य श्रेष्ठ! : एकनाथ शिंदे
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
Embed widget