एक्स्प्लोर
कामगारांच्या प्रश्नांची उत्तरं देणं टाळलं, कार्यक्रमातून रावतेंचा काढता पाय
एसटी कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासून अचानक कामबंद आंदोलन सुरु केलं आहे. पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन सुरु केलं आहे.

मुंबई : राज्यातील 80 टक्के एसटी बससेवा मध्यरात्रीपासून बंद आहे. ऐन सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. मात्र कर्मचाऱ्यांचे प्रश्न विचारल्याने महाराष्ट्राचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा चांगलाच संताप झाला आणि एबीपी माझाच्या कार्यक्रमातून त्यांनी काढता पाय घेतला.
एसटी कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासून अचानक कामबंद आंदोलन सुरु केलं आहे. पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन सुरु केलं आहे. अचानक काम बंद केल्याने सुट्टीवरुन घरी परतणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. हा संप कोणत्याही संघटनेने पुकारलेला नाही, त्यामुळे हा संप अघोषित असल्याने, एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संपाबद्दल संभ्रम आहे.
LIVE एसटी कर्मचाऱ्यांचं अचानक कामबंद आंदोलन
"कोणत्याही कामगार संघटनेने संप पुकारल्याची अधिकृत घोषणा केली नाही किंवा तसं पत्र दिलेलं नाही. त्यामुळे हा आमच्या दृष्टीने हा संप नाही. काही ठिकाणी कामगार गैरहजर आहेत. पण प्रवाशांना वेठीला धरणं चुकीचं आहे. कामगारांनी आपल्या अन्नदात्यांना असं बरोबर नाही," असं दिवाकर रावते म्हणाले.
बेसिक पगारात वाढ करण्याची मागणी कर्मचाऱ्यांची आहे. मात्र कामगारांच्या बेसिकमध्ये मोठी वाढ केल्याचा दावा दिवाकर रावतेंनी केला. मात्र संपाबाबत किंवा कर्मचाऱ्यांबद्दल विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणं त्यांनी टाळलं. त्यानंतर माईक काढून ते थेट उठून गेले.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
