एक्स्प्लोर

मी फाटक्या तोंडाचा म्हणून खा. विशाल पाटील निघून गेले; सांगलीतील सभेत नितेश राणेंची हिंदू गर्जना

राज्यात महायुतीला मोठं यश मिळालं तब्बल 237 जागांवर विजय मिळाल्याने स्पष्ट बहुमतातील सरकार स्थापन झालं आहे.

सांगली : भाजपमधील हिंदुत्ववादी नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) आज सांगली दौऱ्यावर असून सांगलीत त्यांच्या हिंदू गर्जना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. भाजपमधील हिंदुत्ववादी चेहरा म्हणून नितेश राणेंकडे पाहिलं जातं. त्यातच, गेल्या काही महिन्यांपासून नितेश राणेंच्या भाषणातील आक्रमकता आणि एका विशिष्ट समाजाला लक्ष्य करुन ते बोलत असल्याचं पाहायला मिळालं. मात्र, महिनाभरापूर्वीच त्यांनी राज्याच्या मंत्रि‍पदाची शपथ घेतल्याने एखाद्या पक्षाच्या नेत्याप्रमाणे किंवा धार्मिक तेढ निर्माण होईल, असे भाषण त्यांनी टाळावे, असा सूर विरोधकांकडून उमटत आहे. मात्र, आजही सांगलीतील (Sangli) आपल्या भाषणात त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्दयावर भर दिला. तसेच, ईव्हीएममुळे महायुतीचा विजय झाला अशी टीका करणाऱ्या विरोधकांना ईव्हीएमचा वेगळाच अर्थ सांगितला आहे. ईव्हीएम म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मोहल्ला असे म्हणत नितेश राणेंनी पुन्हा एकदा एका विशिष्ट समाजाला आपल्या भाषणातून लक्ष्य केल्याचं दिसून आलं. तसेच, सांगलीचे खासदार विशाल पाटील (Vishal Patil) यांनाही टोला लगावला.  

राज्यात महायुतीला मोठं यश मिळालं तब्बल 237 जागांवर विजय मिळाल्याने स्पष्ट बहुमतातील सरकार स्थापन झालं आहे. मात्र, विरोधकांकडून ईव्हीएमच्या घोळामुळेच भाजप महायुतीचा विजय झाल्याची टीका केली जात आहे. तसेच, ईव्हीएममुळेच महायुतीचा विजय झाल्याचं मविआतील काही नेते म्हणतात. आता, सांगलीतील सभेतून मंत्री नितेश राणेंनी या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. विरोधक ईव्हीएमच्या नावाने बोंबलतात, ईव्हीएम ला दोष देतात. पण विधानसभेला आम्ही तिकडे ईव्हीएमवरच निवडून आलोय. ईव्हीएम म्हणजे एव्हरी व्होट्स अगेन्स्ट मोहल्ला, असा फुलफॉर्म नितेश राणेनी सांगितला. ज्याने भगवाधारी सरकार आणलं त्यांचं संरक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे. महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार आहे, आम्हालाही विशाळगडावर 12 तारखेला कसा उरूस होतो हे बघायचंच आहे, असे म्हणत 12 जानेवारीला विशाळगडावर उरुस निघू देणार नसल्याचं राणेंनी म्हटलं. 

सांगलीत दोन कत्तलखाने सुरू आहेत, ते कसे सुरु आहेत हे खासदार विशाल पाटील यांनी सांगणं गरजेचं होतं. परंतु मी फाटक्या तोंडाचा आहे हे त्यांना माहिती होतं. म्हणूनच, माझ्या भाषणापूर्वीच ते येथील कार्यक्रमातून निघून गेले, असे म्हणत नितेश राणेंनी विशाल पाटील यांनाही लक्ष्य केलं. जो नियम हिंदूंना लागू होतो तो इतर धर्माला देखील लागला पाहिजे. आता सरकार हिंदुत्ववादी आहे, आता कोणाचे लाड चालणार नाहीत, अशा शब्दात राणेंनी भाषणातून आपली भूमिका मांडली. 

विशाळ गडावर उरूस, नितेश राणेंनी सांगितला कायदा

12 तारखेला विशाळगडावर उरुस काढण्याचं नियोजन आहे. विशाळगडावर काही महिन्यांपूर्वी काय घडलंय हे आपणा सर्वांना माहिती आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केलीय. पण, हिंदू समाजाच्या एकंदरीत इच्छेनुसार 12 तारखेला कोणीही विशाळगडावर कायदा व सुव्यवस्था खराब करण्याचं काम करु नये. हिंदू समजाने संयमाने घेतलं असताना इतर समाजानेही संयमाने घ्यावे, उगच कोणालाही चिथावण्याचे काम करु नये, उरुस काढून कोणालाही चिथावण्या प्रकार करू नये. शासन म्हणून आम्ही या घटनांवर लक्ष ठेऊन आहोत, असेही नितेश राणे यांनी म्हटलंय.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रपूर वाघ अन् 'वारां'चा जिल्हा, आम्ही प्रत्येक वारां'चा सन्मान करतो, कारण...; मुनगंटीवारांच्या नाराजीच्या चर्चेवर काय म्हणाले फडणवीस?
चंद्रपूर वाघ अन् 'वारां'चा जिल्हा, आम्ही प्रत्येक वारां'चा सन्मान करतो, कारण...; मुनगंटीवारांच्या नाराजीच्या चर्चेवर काय म्हणाले फडणवीस?
Sanjay Shirsat :  ठाकरे गट फडणवीसांच्या प्रेमात पडलाय, त्याच्या प्रेमाला पवार गट थकलाय; मंत्री संजय शिरसाटांची टीका
ठाकरे गट फडणवीसांच्या प्रेमात पडलाय, त्याच्या प्रेमाला पवार गट थकलाय; मंत्री संजय शिरसाटांची टीका
Novak Djokovic : ऑस्ट्रेलियात मला विष देण्यात आले; टेनिस जगताचा बादशाह नोव्हाक जोकोविचच्या सनसनाटी आरोपाने जग हादरले
ऑस्ट्रेलियात मला विष देण्यात आले; टेनिस जगताचा बादशाह नोव्हाक जोकोविचच्या सनसनाटी आरोपाने जग हादरले
Uddhav Thackeray: अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणं योग्य नाही, ज्यांना जायचंय त्यांनी जा; उद्धव ठाकरेंनी पक्षातील नाराजांना सुनावलं
अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणाऱ्या नगरसेवकांवर उद्धव ठाकरे डाफरले, म्हणाले, 'ज्यांना जायचंय त्यांनी जा'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalna Manoj Jarange : धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी षडयंत्र, मनोज जरांगे यांची टीकाBar Raid Video Viral : ठाकरेंची बदनामी करणारा अंधेरीतील बारचा जुना व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरलSharad Pawar NCP : पालिका निवडणुका तोंडावर असताना तिन्ही पक्षांची चर्चा न झाल्यानं पवारांची नाराजीSantosh Deshmukh Case:Vishnu Chate च्या मोबाईवरून Walmik Karad ने खंडणी मागितली?आवाजाचे सॅम्पल घेणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रपूर वाघ अन् 'वारां'चा जिल्हा, आम्ही प्रत्येक वारां'चा सन्मान करतो, कारण...; मुनगंटीवारांच्या नाराजीच्या चर्चेवर काय म्हणाले फडणवीस?
चंद्रपूर वाघ अन् 'वारां'चा जिल्हा, आम्ही प्रत्येक वारां'चा सन्मान करतो, कारण...; मुनगंटीवारांच्या नाराजीच्या चर्चेवर काय म्हणाले फडणवीस?
Sanjay Shirsat :  ठाकरे गट फडणवीसांच्या प्रेमात पडलाय, त्याच्या प्रेमाला पवार गट थकलाय; मंत्री संजय शिरसाटांची टीका
ठाकरे गट फडणवीसांच्या प्रेमात पडलाय, त्याच्या प्रेमाला पवार गट थकलाय; मंत्री संजय शिरसाटांची टीका
Novak Djokovic : ऑस्ट्रेलियात मला विष देण्यात आले; टेनिस जगताचा बादशाह नोव्हाक जोकोविचच्या सनसनाटी आरोपाने जग हादरले
ऑस्ट्रेलियात मला विष देण्यात आले; टेनिस जगताचा बादशाह नोव्हाक जोकोविचच्या सनसनाटी आरोपाने जग हादरले
Uddhav Thackeray: अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणं योग्य नाही, ज्यांना जायचंय त्यांनी जा; उद्धव ठाकरेंनी पक्षातील नाराजांना सुनावलं
अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणाऱ्या नगरसेवकांवर उद्धव ठाकरे डाफरले, म्हणाले, 'ज्यांना जायचंय त्यांनी जा'
Fact Check : मुनव्वर फारुकीला मारहाण झाल्याचा दावा करत व्हिडीओ व्हायरल, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
मुनव्वर फारुकीला मारहाण झाल्याचा दावा करत व्हिडीओ व्हायरल, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
SN Subrahmanyan:  पत्नीकडे किती वेळ पाहणार? 90 तास काम करा,एल अँड टीचे चेअरमन सल्ला देऊन फसले, ट्रोल होताच कंपनीचं स्पष्टीकरण
एस.एन. सुब्रह्मण्यन यांचं 90 तास कामाचं लॉजिक नेमकं काय? टीका होताच एल अँड टीचं स्पष्टीकरण
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराचं थेट लोणार सरोवरशी कनेक्शन? मेडीकल कॉलेजच्या डीननेच सांगितलं
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराचं थेट लोणार सरोवरशी कनेक्शन? मेडीकल कॉलेजच्या डीननेच सांगितलं
Manoj Jarange Patil : धनंजय देशमुखांना धमकी दिल्याचा आरोप, मनोज जरांगे संतापले, धनुभाऊंचा एकेरी उल्लेख करत म्हणाले...
धनंजय देशमुखांना धमकी दिल्याचा आरोप, मनोज जरांगे संतापले, धनुभाऊंचा एकेरी उल्लेख करत म्हणाले...
Embed widget