एक्स्प्लोर
मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाड, लोकल 20 मिनिटं उशिराने
कुर्ला आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
मुंबई : मध्य रेल्वेवर लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना सकाळ-सकाळीच त्रासाला सामोरं जावं लागत आहे. कुर्ला आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
कुर्ला आणि विद्याविहार या स्टेशनच्या दरम्यान एक लोकल थांबवण्यात आली. काही वेळाने ती धीम्या गतीने रवाना झाली, मात्र सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरु आहे.
तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. विद्याविहारपासून सीएसएमटीला जाणाऱ्या स्लो लोकल फास्ट मार्गावरुन वळवण्यात आल्या आहेत.
सकाळीच झालेल्या 'लोकलखोळंब्या'मुळे प्रवाशांना ऑफिसला जाण्यासाठी उशीर होऊ शकतो. त्यामुळे वेळेचं नियोजन करुन नेहमीपेक्षा थोडं लवकरच घराबाहेर पडण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement