Mumbai Crime News: मुंबईमध्ये वृद्धांची सुरक्षा वाऱ्यावर! सेलोटेपने हातपाय बांधले,तोंडात कापसाचा बोळा कोंबला; ताडदेवमध्ये वृद्ध महिलेची हत्या
पती पत्नीला दोरी आणि सेलोटेपच्या साहाय्याने बांधून ठेवले आणि दागिन्यांची चोरी केली आणि पसार झाले. याप्रकरणी ताडदेव पोलीस व गुन्हे शाखा अधिक तपास करत आहेत.
मुंबई : मुंबईतील ताडदेवमध्ये एका वृद्ध महिलेची (Mumbai Tardeo Murder) हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी दोषी असलेल्या आरोपींचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. पोलीसांना मिळालेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरुन या आरोपींचा शोध सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून आरोपींनी घराची रेकी केल्याचा संशय पोलिसांना आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी गाठून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या हत्येनंतर मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर महानगरांमध्ये एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे
रविवारी (13 ऑगस्ट) सकाळी ही घटना घडली आहे. ताडदेव मेन रोडवरील युसुफ मंझिलमध्ये राहणाऱ्या वृध्द पती पत्नीच्या घरात शिरून त्यांना बांधून ठेवण्यात आले. चिकटपट्टी, कापसाच्या बोळे तोंडात टाकल्याने श्वास कोंडला गेल्याने 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. सुरेखा मदन अग्रवाल (70 वर्षे) असे मृत महिलेचे नाव आहे.मृत महिलेचे पती मदन हे सकाळी सहाच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडत असतानाच चार ते पाचजण आले. त्यांना आतमध्ये ढकलले आणि पती पत्नीला दोरी आणि सेलोटेपच्या साहाय्याने बांधून ठेवले आणि दागिन्यांची चोरी केली आणि पसार झाले. याप्रकरणी ताडदेव पोलीस व गुन्हे शाखा अधिक तपास करत आहेत.
दाम्पत्य एकटे राहत असल्याने दरोडेखोरांकडून टार्गेट
मुंबई पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा शोध घेत आहेत. आरोपींना मरीन ड्राईव्हवर सोडणाऱ्या टॅक्सी ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली होती. परंतु टॅक्सी चालकाचा दावा आहे की, इतर प्रवाशांप्रमाणे त्याने त्यांना सोडले. प्रवसादरम्यान आरोपींमध्ये अशा कोणत्याही घटनेची चर्चा झाली नाही. ज्येष्ठ नागरिक दाम्पत्य एकटे राहिल्याने दरोडेखोरांनी त्यांना टार्गेट केले दिसून येत आहे.
ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर
या प्रकरणानंतर महानगरांमध्ये एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आजचा नाही तर हा पूर्वीपासून आहे. आरोपीला शोधण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही मदत घेत आहे. दरम्यान घरात एकटे राहणाऱ्या वृद्धांनी घराजवळ असलेल्या पोलीस ठाण्यात माहिती दिली असे पोलिसांनी आवाहन केले आहे.
हे ही वाचा :