एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Poll of Polls)
अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं कंत्राट 'एल अँड टी' कंपनीला
तीन निविदांपैकी सर्वात कमी असलेली 'एल अँड टी' कंपनीची 3 हजार 826 कोटी रुपयांची निविदा पात्र ठरली.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं कंत्राट 'एल अँड टी' कंपनीला देण्यात आलं आहे. प्रकल्पासाठी विविध विभागांकडून एकूण 12 ना हरकत दाखले मिळाले आहेत.
शिवस्मारकाची जागा राजभवनापासून 1.2 किमी, गिरगाव चौपाटीपासून 3.6 किमी आणि नरिमन पॉइंटपासून 2.6 किमी अंतरावर आहे. 6.8 हेक्टर बेटावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा 210 मीटर उंचीचा पुतळा आहे. हा जगातील सर्वाधिक उंचीचा पुतळा ठरणार आहे.
तीन निविदांपैकी सर्वात कमी असलेली 'एल अँड टी' कंपनीची 3 हजार 826 कोटी रुपयांची निविदा पात्र ठरली. हा प्रकल्प 2 हजार 500 कोटी रुपयांचा असून त्यामध्ये जीएसटी धरण्यात आलेला नाही.
हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 36 महिन्यांचा कालावधी लागण्याचा अंदाज आहे. शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार बनवणार आहेत.
शिवस्मारकात काय काय?
या स्मारकामध्ये मंदिर, संग्रहालय, रुग्णालय, रायगड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती आणि शिवाजी महाराजांचं जीवनपट उलगडण्यासाठी थिएटर असेल. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पर्यटकांना शिवस्मारक पाहता यावं, यासाठी 180 मीटर उंचीवर जाणारी लिफ्ट असेल.
संबंधित बातम्या
पंतप्रधान मोदींच्या हस्ते शिवस्मारकाचं भूमिपूजन संपन्न
शिवस्मारकाच्या भूमीपूजनाला अरबी समुद्रात फक्त हे सहा जण उतरणार!
शिवस्मारक: जल-माती कलशाची भव्य शोभायात्रा
शिवमय नव्हे भाजपमय, शिवस्मारकाच्या कलशयात्रेवर मेटे नाराज
‘शिवस्मारक व्हावे ही बाळासाहेबांची इच्छा’ शिवसेनेची पोस्टरबाजी
मोदींच्या हस्ते 24 डिसेंबरला शिवस्मारकाचं भूमिपूजन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
भविष्य
Advertisement