Mumbai Corona Update : मुंबईत आज 191 नव्या कोरोना रुग्णाची भर, एकाचा मृत्यू
Mumbai Corona : आतापर्यंत 07 लाख 43 हजार 600 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के आहे. मुंबईचा कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 2940 दिवस झालाय.
![Mumbai Corona Update : मुंबईत आज 191 नव्या कोरोना रुग्णाची भर, एकाचा मृत्यू mumbai reports 191 new covid 19 cases one deaths in the last 24 hours Mumbai Corona Update : मुंबईत आज 191 नव्या कोरोना रुग्णाची भर, एकाचा मृत्यू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/07/353f718ce2b5325b7c6b8d09b0a871fc_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mumbai Corona Update : देशातील दैनंदिन कोरोना रुग्णांमध्ये घट होत असतानाच मुंबईमधील रुग्णसंख्यामध्ये चढउतार पाहायला मिळत आहे. मुंबई महानगरपालिकेनं दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मुंबईत 191 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू झालाय. याच कालावधीत मुंबईत 235 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आतापर्यंत 07 लाख 43 हजार 600 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के आहे. मुंबईचा कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 2940 दिवस झालाय. मुंबईत सध्या 1 हजार 668 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत आज 30501 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. तर, मुंबईत आजपर्यंत एकूण 126 लाख 43 हजार 665 नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
ओमायक्रॉनचे दोन रूग्ण
ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळल्यानंतर मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. डोंबिवली आणि पुण्यानंतर आता मुंबईतही ओमायक्रॉन व्हेरियंटने शिरकाव केलाय. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार, सोवारी मुंबईतील दोन जणांना ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाल्याचे सिध्द झाले आहे . यामुळे महाराष्ट्रातील ओमायक्रॉन विषाणू आढळलेल्या रुग्णांची संख्या आता 10 झाली आहे. दक्षिण आफ्रिकाहून 25 नोव्हेंबर रोजी मुंबईत आलेल्या 37 वर्षीय व्यक्तीला ओमायक्रॉन विषाणूची लागण झाली आहे. या व्यक्तीसोबत राहिलेल्या अन् अमेरिकेतून आलेल्या 36 वर्षीय व्यक्तीलाही ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाल्याचे प्रयोगशाळा अहवालातून समोर आले आहे. या दोन्ही रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत , हे दोन्ही रुग्ण सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार घेत आहेत. या दोन्ही रुग्णांनी फायझर लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. या दोन्ही रुग्णांच्या संपर्कात आलेल्या पाच अतिजोखमीच्या आणि 315 कमी जोखमीच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात आलेला आहे. पुढील तपास सुरु आहे.
संबंधित बातम्या :
- Omicron Variant : काळजी घ्या, मास्क वापरा! राज्याची चिंता वाढली, ओमायक्रॉनबाधितांची संख्या 10 वर
- Omicron Variant : ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार, बाधितांची संख्या 336वर, प्रशासन हायअलर्टवर
- कोई सरहद ना इने रोके...भारतीय तरुणीला भेटण्यासाठी ओलांडली बॉर्डर, पाकिस्तानी तरुणाला अटक
- Omicron in India : दक्षिण आफ्रिकेच्या विषाणूला हरवलं पण पुन्हा कोरोनानं गाठलं, देशातील पहिल्या ओमायक्रॉन रुग्णाची लक्षणं काय?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)