Omicron in India : दक्षिण आफ्रिकेच्या विषाणूला हरवलं पण पुन्हा कोरोनानं गाठलं, देशातील पहिल्या ओमायक्रॉन रुग्णाची लक्षणं काय?
Omicron in India : पाच राज्यात ओमायक्रॉन व्हेरियंटने शिरकाव केलाय. कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आणि राज्यस्थानमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत.
![Omicron in India : दक्षिण आफ्रिकेच्या विषाणूला हरवलं पण पुन्हा कोरोनानं गाठलं, देशातील पहिल्या ओमायक्रॉन रुग्णाची लक्षणं काय? coronavirus bengaluru doctor recovers from omicron tests covid positive again Omicron in India : दक्षिण आफ्रिकेच्या विषाणूला हरवलं पण पुन्हा कोरोनानं गाठलं, देशातील पहिल्या ओमायक्रॉन रुग्णाची लक्षणं काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/07/353f718ce2b5325b7c6b8d09b0a871fc_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Omicron in India : ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णात देशात दिवसागणिक वाढ होत आहे. कर्नाटकमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचे पहिले दोन रुग्ण आढळले होते. त्यानंतर गुजरात, महाराष्ट्र, राज्यस्थान आणि दिल्लीमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण आढळले. देशात सर्वाधिक ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. देशात सर्वात आधी बंगळुरुमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचे दोन रुग्ण आढळले होते. या दोन रुग्णापैकी एका रुग्णाने ओमायक्रॉनवर मात केली. मात्र, त्या रुग्णाला कोरोनानं पुन्हा गाठलं आहे.
ओमायक्रॉन व्हेरियंटवर मात करणाऱ्या बंगळुरुतील डॉक्टर रुग्णाला कोरोनाची लागण झाली आहे. देशात आढळेल्या पहिल्या दोन रुग्णापैकी हा एक रुग्ण होता. सध्या हा रुग्ण उपचार घेत आहे. तर दुसऱ्या रुग्णाने गुपचूप देश सोडलाय. हा दक्षिण आफ्रिकेतील(मूळचा गुजरातमधील) व्यक्ती आहे. या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या व्यक्तीला क्वारंटाईन करण्यात आलं होतं. मात्र, त्यानं तेथून पळ काढलाय.
डॉक्टर पुन्हा क्वारंटाईन -
ओमायक्रॉनला हरवल्यानंतर पुन्हा कोराबाधित झालेला डॉक्टर रुग्ण सध्या क्वारंटाईनमध्ये आहे. त्यामध्ये सध्या कोणताही लक्षणं आढळलेली नाहीत. तर क्वारंटाईन नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी दक्षिण आफ्रिकेच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केलाय. हा व्यक्ती कुणालाही न कळवता देशाबाहेर गेलाय.
महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णांची नोंद -
ओमायक्रॉन व्हेरियंटच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद महाराष्ट्रात आहे. डोंबिवलीमध्ये पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये सहा तर पुण्यात एक रुग्ण आढळला. सोमवारी मुंबईत ओमायक्रॉनच्या दोन रुग्णाची भर पडली होती.
देशातील रुग्णाची संख्या -
पाच राज्यात ओमायक्रॉन व्हेरियंटने शिरकाव केलाय. कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आणि राज्यस्थानमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधइक 10 रुग्ण आढळले आहेत. तर राज्यस्थानमध्ये 9 रुग्ण आढळले आहेत. कर्नाटकमध्ये दोन तर गुजरात आणि दिल्लीमध्ये प्रत्येकी एक-एक रुग्ण आढळलाय.
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)