एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईच्या पावसाचे 3 बळी, विक्रोळीत 2 घरं कोसळून तिघांचा मृत्यू
मुंबईत दोन घरं कोसळून तिघांचा मृत्यू झाला आहे. मुंबईच्या विक्रोळी भागात काल रात्री ही घटना घडली. यात काहीजण जखमी झाल्याचीही प्राथमिक माहिती आहे.
मुंबई : मुंबईसह उपनगरांना मंगळवारी पावसानं धुवून काढलं. काल सकाळपासून सुरु असलेल्या पावसानं रात्री काहीशी उसंत घेतली. मात्र या पावसामुळे मुंबईत दोन घरं कोसळून तिघांचा मृत्यू झाला आहे. मुंबईच्या विक्रोळी भागात काल रात्री ही घटना घडली. यात काहीजण जखमी झाल्याचीही प्राथमिक माहिती आहे.
मुंबईतील विक्रोळीच्या वर्षा नगर भागात मुसळधार पावसामुळे दोन घरं काल रात्री कोसळली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत काही लोक जखमीही झाले आहेत. दुसरीकडे विक्रोळीतील पार्कसाईटच्या वर्षानगर भागात एक भिंत एका घरावर कोसळली, ज्यात दोन वर्षीय कल्याणी जंगम या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे, तर तिचे आई-वडिल गंभीर जखमी झाले आहेत.
https://twitter.com/ANI/status/902598254717571072
मुंबईतील कालच्या पावसानं 26 जुलैची आठवण
काल मुंबईत कोसळलेल्या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं. दिवसभरात मुंबईत 298 मिमी पावसाची नोंद कऱण्यात आली. 1997 नंतरचा हा सर्वात मोठा पाऊस आहे. दरम्यान या पावसानंतर मुंबईत हेलिकॉप्टर, एनडीआरएफ आणि नेव्हीला हायअलर्टवर ठेवण्यात आलंय.
पावसानं मुंबईतील अनेक रस्ते पाण्याखाली
मुंबईतील मुसळधार पावसानं दादर, अंधेरी, कुर्ला, जुहू, सायन, कुर्ला,परेल, हिंदमाता, किंग्स सर्कल, बांद्रा, जेव्हीएलआर, एसव्ही रोड, आदी परिसरात पाणी भरलं. रेल्वे ट्रकवर पाणी साचल्यानं लोकलसेवा ठप्प झाली, ज्यामुळे अनेकांना स्टेशनवरच रात्र काढावी लागली. आसपासच्या परिसरात राहणाऱ्या मुंबईकरांना चालत घर गाठावं लागलं.
एबीपी माझा ट्रॅफिक अपडेट 7AM
लोकल रेल्वेची सद्यस्थिती
- पश्चिम रेल्वे मार्गावर रात्री 11. 58 मिनिटांनी चर्चगेटवरुन विरारच्या दिशेने पहिली लोकल धावली.
- तर मध्य रेल्वे मार्गावर रात्री 12. 46 मिनिटांनी माटुंगा ते डोंबिवली दरम्यान पहिली लोकल धावली.
- मध्य रेल्वेची घाटकोपरपासून कल्याणकडे जाणारी वाहतूक सुरु करण्यात आली होती, मात्र ती पुन्हा थांबवल्याने मध्य रेल्वे ठप्प
- दुसरीकडे हार्बर रेल्वेबाबत अद्याप न बोललेलंच बरं, हार्बर रेल्वे अजूनही बंद
- ठाणे- वाशी ट्रान्स हार्बरची वाहतूक सुरु
- प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई मेट्रो रात्री 12.40 पर्यंत सुरु होती, सकाळी ती नियमित सुरु झाली.
- www.abpmajha.in
- रात्रभर जॅम असलेले पूर्व आणि पश्चिम एक्स्प्रेस हायवे काहीसा मोकळा झाला आहे.
- इस्टर्न फ्री वेवरही सध्या ट्रॅफिक नाही
- जेव्हीएलआर मार्गावरील ट्रॅफिक रात्रीत रिकामं झालं आहे
- सायन-पनवेल महामार्गावरही ट्रॅफिक नाही
- नवी मुंबई – मुंबईच्या दिशेने येणारी पुणे आणि गोवा महामार्गाची वाहतूक रात्री १२ नंतर सुरू करण्यात आली आहे.
- मुंबईत विक्रमी पाऊस, वरळीत 303 मिमी पावसाची नोंद, रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतूक ठप्प
- रस्त्यांवर गुडघाभर पाणी, रेल्वे ट्रॅकवरुन प्लॅटफॉर्मपर्यंत पाणी
- मुंबईकडे येणारे महामार्ग रोखले, एण्ट्री पॉईंटवरील टोलवसुलीही थांबवली
- मुंबईत दूध,भाजीपाल्याचा तुटवडा जाणवण्याची शक्यता
- अनेक कर्मचारी कार्यालयांत अडकले, बुधवारी शाळा, कार्यालयांना सुट्टी
- दादर, माहिम, परळ, लालबाग परिसरातील वीज गायब
- एसटी डेपोत प्रवाशांची गर्दी, एसटीकडून कसारा, नाशिक मार्गावर जादा बसेस
- बेस्टकडून मुंबईत जादा बसेसचा पुरवठा
- सिद्धीविनायक ट्रस्टकडून पावसात अडकलेल्यांची मंदिरात राहण्याची सोय
- लालबागचा राजा मंडळाकडून पावसात अडकलेल्यांची जेवण-खाण्याची सोय
- मदत आणि बचाव कार्यासाठी एनडीआरएफची पथकं मुंबईत
- मुंबईतील केईएम रुग्णालयात पाणी शिरलं
- रेल्वे बंद असल्याने कार्यालये दुपारी सोडूनही चाकरमानी स्टेशन्सवर अडकले
- महापालिकेची सर्व यंत्रणा रस्त्यावर, महापौरांचा दावा
- मुख्यमंत्र्यांची आपत्कालीन नियंत्रण कक्षात धाव
- राष्ट्रपती,पंतप्रधान, गृहमंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांना फोन, सर्वतोपरी मदतीची हमी
- ठाणे शहरातही वीजपुरवठा खंडीत
- मुंबईत येणाऱ्या अनेक एक्स्प्रेस रद्द
- मुंबईत अनेक ठिकाणी रात्रभर फूडमॉल सुरु राहणार
- रस्त्यात कुठेही अडकल्यास हेल्पलाईन नंबर – 100 आणि 1916
मुसळधार पावसामुळे मुंबई तुंबली : महापौर
स्टेशनवर अडकला आहात? मुंबईतील या मार्गांवर बेस्टकडून अतिरिक्त बस
मुंबईत गेल्या एका तासात कुठे किती पाऊस? विभागनिहाय आकडेवारी
उभ्या पावसात पोलिसांचं काम पाहा, एक कडक सॅल्युट ठोकाल!अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण
Advertisement