एक्स्प्लोर

मुंबईत पावसाची उसंत, पाणी ओसरण्यास सुरुवात, चर्चगेट-विरार वाहतूक सुरु

आज सकाळी साडे आठच्या सुमारास विरारवरुन चर्चगेटसाठी जाणाऱ्या 5 लोकल सोडण्यात आल्या आहेत.

मुंबई: मुंबईसह उपनगरात गेल्या चार दिवसांपासून धो धो कोसळणाऱ्या पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे रेल्वे ट्रॅकवर तुंबलेलं पाणी ओसरत आहे. त्याचाच परिणाम म्हणून 24 तासांहूनही अधिक काळ बंद असणारी विरार स्टेशनवरुनची रेल्वे सेवा अखेर हळूहळू सुरु झाली आहे. आज सकाळी साडे आठच्या सुमारास विरारवरुन चर्चगेटसाठी जाणाऱ्या 5 लोकल सोडण्यात आल्या आहेत. मात्र रुळांवर काही प्रमाणात अजूनही पाणी असल्यामुळे लोकल चक्क 10 किलोमीटर प्रतीतास या वेगानं चालवल्या जात आहेत. पाणी ओसल्यावर रेल्वे सुरळीत होईल, असं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. तुफान पावसामुळे नालासोपारा रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेला होता. परिणामी पश्चिम रेल्वेची वाहतूक चर्चगेट ते भाईंदरपर्यंतच सुरु होती. मात्र आता ती विरारपर्यंत सुरु झाली आहे. मात्र पश्चिम रेल्वे मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्या रखडल्या आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्या मुंबईकडे आणि मुंबईतून बाहेरही जाऊ शकत नाहीत. हवामानाचा अंदाज काल मध्य महाराष्ट्रत तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. तर विदर्भ आणि कोकणात काही ठिकाणी मुसळधार पाऊस नोंदवण्यात आला. सलग चौथ्या दिवशी मुंबई पाण्यानं भरली होती. राज्यभर पावसाचा जोर वाढलेला असतानाच, मान्सूनची सिमा अजूनही स्थिर बघायला मिळतेय. मान्सूनचे ढग संपूर्ण राज्यभर दाट पसरलेले दिसून येत आहेत. कोकण-गोव्यातील अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा अजूनही कायम आहे. येत्या २४ तासात  मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १० जुलै म्हणजे काल पडलेल्या पावसाची विभागवार आकडेवारी.... कोकण विभागात सरासरी ३५.३ मिमी पाऊस होतो. तिथे ८३.५ मिमी म्हणजे सरासरीच्या १३६ टक्के जास्त पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरी ८.७ मिमी पाऊस पडतो. तिथे ८.३ मिमी म्हणजे सरासरीच्या ४ टक्के कमी पाऊस नोंदवला गेला. मराठावाड्यात सरासरी ५ मिमी पाऊस होतो. तिथे १२ मिमी म्हणजेच सरासरीच्या १४० टक्के जास्त पाऊस झाला. तर विदर्भात सरासरी १०.३ मिमी पाऊस होतो. तिथे २७.१ मिमी म्हणजेच १३६ टक्के जास्त पाऊस झाला. संपूर्ण राज्यात सरासरी ११ मिमी पाऊस पडतो. तिथे यंदा २२.९ मिमी म्हणजेच सरासरीच्या १०८ टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
'उत्सव रंगभूमीचा, सोहळा शिवराज्याभिषेकाचा' ब्रीदवाक्यासह 'अहिल्यानगर महाकरंडक' राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा जानेवारीत रंगणार
जानेवारीत रंगणार 'अहिल्यानगर महाकरंडक' राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा, रंगकर्मींकडून जय्यत तयारी सुरु
Gold : कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
Vaibhav Suryavanshi: 6,6,6,6  अन्  8 चौकार ठोकले,13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा विजय हजारे ट्रॉफीत धमाका 
6,6,6,6 अन्  8 चौकार ठोकले,13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची विजय हजारे ट्रॉफीत धमाकेदार फलंदाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh : कराडच्या शरणागतीनंतर मस्साजोगमध्ये भीतीचं वातावरण? देशमुख काय म्हणाले?Walmik Karad Surrendered : गुन्हा दाखल झाला तेव्हा कराड उजैनला होते, माजी नगरसेवकाचा दावा!Jitendra Awhad Full PC : आधीच सेटिंग झालेली, कराड शरण येताच आव्हाडांची सर्वात मोठा दावाSandeep kshirsagar On Walmik Karad : वाल्मिक कराड दोषी नव्हता मग फरार का झाला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
'उत्सव रंगभूमीचा, सोहळा शिवराज्याभिषेकाचा' ब्रीदवाक्यासह 'अहिल्यानगर महाकरंडक' राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा जानेवारीत रंगणार
जानेवारीत रंगणार 'अहिल्यानगर महाकरंडक' राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा, रंगकर्मींकडून जय्यत तयारी सुरु
Gold : कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
Vaibhav Suryavanshi: 6,6,6,6  अन्  8 चौकार ठोकले,13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा विजय हजारे ट्रॉफीत धमाका 
6,6,6,6 अन्  8 चौकार ठोकले,13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची विजय हजारे ट्रॉफीत धमाकेदार फलंदाजी
वाल्मिक कराड CID समोर शरण, मिलिंद नार्वेकरांकडून फडणवीस अन् रश्मी शुक्लांचं अभिनंदन; दमानियांकडून फिरकी, म्हणाल्या...
वाल्मिक कराड शरण येताच मिलिंद नार्वेकरांचं ट्विट, मुख्यमंत्री अन् रश्मी शुक्लांचं अभिनंदन करत म्हणाले...
वाल्मिक कराड शरण, पुण्यातून बीडला रवाना; CID अधिकारी आव्हाडांनी सांगितलं पुढं काय?
वाल्मिक कराड शरण, पुण्यातून बीडला रवाना; CID अधिकारी आव्हाडांनी सांगितलं पुढं काय?
Suresh Dhas on Walmik Karad : आका शरण आला, आता आकाच्या आकाला बिनखात्याचे मंत्री करा
Suresh Dhas on Walmik Karad : आका शरण आला, आता आकाच्या आकाला बिनखात्याचे मंत्री करा
धक्कादायक! सरकारी रुग्णालयात सफाई कर्मचारीच तपासतोय रुग्ण; डॉक्टरांच्या उत्तराने भीषण वास्तव समोर
धक्कादायक! सरकारी रुग्णालयात सफाई कर्मचारीच तपासतोय रुग्ण; डॉक्टरांच्या उत्तराने भीषण वास्तव समोर
Embed widget