एक्स्प्लोर
मुंबईतील पवई प्लाझामधील आग आटोक्यात
मुंबई : मुंबईतील हिरानंदानी गार्डनमधील पवई प्लाझामध्ये लागलेली आग आटोक्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.
पवई प्लाझा ही कमर्शिअल इमारत आहे. पवई प्लाझामधील तिसऱ्या मजल्यावर आज सकाळी सव्वा अकराच्या सुमारास आग लागली.
आगीत तीन दुकानं आणि कॉर्पोरेट हाऊस जळून खाक झाले आहेत. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झालेली नाही.
आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement