मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी आवश्यक असल्यास कृत्रिम पाऊस पाडणार, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती
मुंबई महापालिकेनं पहाटे मुंबई द्रुतगती महामार्ग पाण्यानं स्वच्छ करण्याचं काम हाती घेतलं. पालिकेकडून रस्त्यावर पाणी फवारुन स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. हजार टँकर भाड्याने घेऊन मुंबई धुण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
मुंबई : मुंबईत सुरु असलेल्या महापालिकेच्या (BMC) स्वच्छता कामांची... धूळ आणि वाढत्या प्रदूषणांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. प्रदूषण (Mumbai Pollution) नियंत्रणात आणण्याचे आदेश यंत्रणाना दिले आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यकता भासल्यास दुबईतील कंपनीशी करू कृत्रीम पाऊस पाडू, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले. पालिकेच्या कामांचा आढावा घेण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री शिंदे आणि पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल उपस्थित होते. वांद्र्यातील कलानगर उड्डाणपुलापासून पश्चिम द्रुतगती महामार्गावरील जुहू तारा रस्त्यापर्यंत मुख्यमंत्री शिंदेंनी स्वच्छतेची पाहणी केली.या वेळी वांद्रे पूर्व,पश्चिम भागातील नागरिकांशी संवाद साधला
मुंबई महापालिकेनं पहाटे मुंबई द्रुतगती महामार्ग पाण्यानं स्वच्छ करण्याचं काम हाती घेतलं. पालिकेकडून रस्त्यावर पाणी फवारुन स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, महापालिकेच्या उपाययोजनांची पाहणी केली. रस्ते धुतले जात आहे. माती काढली काढली जात आहे. पाण्याची फवारणी केली जात आहे. हजार टँकर भाड्याने घेऊन मुंबई धुण्याचे आदेश दिले आहे. बांधकाम व्यावसायिकांनी सहकार्य करावे. स्प्रिंकलर,स्मॉगरचा वापर करून हवेतील धुलीकण कमी करण्यास मदत होणार आहे.
हजार टँकर भाड्याने घेऊन मुंबई धुण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
महापालिका आयुक्त,अधिकारी युद्धपातळीवर कामाला लागले आहे. विकासकामांमुळे होत असलेल्या प्रदुषणावर नियंत्रणांत आणण्याचे आदेश दिले आहेत. एक दिवसाआड मुंबईतले रस्ते धुतले जाणार आहे. आवश्यकता भासल्यास कृत्रिम पावसाचा प्रयोगही करणार आहे. दुबईतील कंपनीशी कृत्रिम पावसासाठी सामंजस्य करार करण्यात येईल. मुंबईतील बागांमध्ये जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या विभागांतील साफसफाईची पाहणी करणार आहे. कलानगरपासून सुरूवात केली आहे. केवळ कलानगर नाही तर संपूर्ण मुंबई स्वच्छ करणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
वातावरणातील घातक धूलीकणांचे प्रमाण वाढले
वातावरणातील बदलांमुळे मुंबई महानगरासह मुंबई प्रदेशातील हवेच्या गुणवत्तेवर (Air Quality In Mumbai) विपरित परिणाम होत आहे. याचा परिणाम म्हणून हवेतील प्रदूषणात वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याबाबत बांधकाम आणि प्रदूषणाशी संबंधित सर्व संस्था, संघटनांची संयुक्त बैठक महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी नुकतीच घेतली होती. मुंबईत सुरू असलेल्या सर्व बांधकामांच्या ठिकाणी धूळ आणि प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे सक्त निर्देश त्यांनी दिले होते. वातावरणातील घातक धूलीकणांचे प्रमाण वाढले आहे. माझगाव, कुलाबा, अंधेरी, मालाड, परळ, मुलुंड या परिसरातील हवा अतिवाईट श्रेणीत असल्याची नोंद झाली. मुंबई शहरात धुलीकणांच्या प्रमाणाने अतिधोकादायक पातळी ओलांडली आहे. सतत वाढत असलेल्या प्रदुषणामुळे मुंबईतील हवेचा दर्जा खालावला आहे.