Ganeshotsav 2021 : गणेशोत्सवासाठी मुंबई पोलीस सज्ज; मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई तर गणपती मंडळांसाठीसुद्धा नियम
Ganeshotsav 2021 : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून येत्या गुरुवारपासून मुंबई पोलीस मास्क न घालता रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करणार आहेत.
![Ganeshotsav 2021 : गणेशोत्सवासाठी मुंबई पोलीस सज्ज; मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई तर गणपती मंडळांसाठीसुद्धा नियम Mumbai Police ready for Ganeshotsav Action against those who do not wear masks, but also rules for Ganeshotsav Mandals Ganeshotsav 2021 : गणेशोत्सवासाठी मुंबई पोलीस सज्ज; मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई तर गणपती मंडळांसाठीसुद्धा नियम](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/01/7a6f73eb44a095908d45e438f6c8a9ef_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : गणपतीच्या आगमनाला फक्त काही दिवस शिल्लक आहेत. या दरम्यान मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जेणेकरून लोकांमध्ये कोरोनाच्या नियमांचा काटेकोरपणे पालन करण्यात येईल.
गुरुवारपासून मुंबई पोलीस मास्क न घालता रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करणार आहेत. बुधवारी सह आयुक्त कायदा आणि सुव्यवस्था विश्वास नांगरे पाटील यांनी सर्व पोलीस ठाण्यांना सूचना दिल्या आहेत, प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यास सांगितलं आहे.
यासह, मुंबई पोलिसांनी गणेशोत्सवाचं आयोजन करणाऱ्यांना भक्तांसाठी ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्याचं आवाहन गणेशोत्सव मंडळांना केलं आहे. याशिवाय जर भक्तांना मंडळाला भेट द्यायची असेल आणि गणपतीचं दर्शन घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी टोकन यंत्रणेची व्यवस्था करा जेणेकरून जास्त गर्दी होणार नाही, असंही मुंबई पोलिसांच्या वतीनं आवाहन करण्यात आलं आहे.
मुंबई पोलिसांनी एकूण 13 विशेष पथकं तयार केली आहेत. ज्यात 1 वरिष्ठ पोलीस निरीक्षक, 1 एपीआय, 2 पीएसआय असे 11 कॉन्स्टेबल असतील. मुंबईत एकूण 13 झोन आहेत आणि प्रत्येक झोनमध्ये एक पथक तैनात असेल. झोनमध्ये कोरोनाचे नियम पाळले जात आहेत की, नाही यावर हे पथक लक्ष ठेवेल. जर कोरोनाचे नियम कुठेही पाळले जात नसतील, तर स्थानिक पोलीस त्यावर कारवाई करत आहेत की नाही. कोरोनाचे नियम कुठेही पाळले जात आहेत की नाही? आणि स्थानिक पोलीस त्यावर कारवाई करत आहेत की, नाहीत? यावर लक्ष ठेवते आणि जर स्थानिक पोलिसांनी कारवाई केली नाही, तर या विशेष पथकाद्वारे कारवाई करण्यात येईल तसेच स्थानिक पोलिसांनी जर कारवाई केली नाही तर या विशेष पथकाद्वारे देण्यात आलेल्या रिपोर्टनुसार स्थानिक पोलीस स्टेशनच्या संबंधित अधिकाऱ्यांवरसुद्धा कारवाई करण्यात येईल.
पोलीस सह आयुक्त कायदा आणि सुव्यवस्था विश्वास नांगरे पाटील यांनी बुधवारी सर्व पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस उपायुक्त आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन सर्वांना याबाबत सूचना दिल्या आहेत. विश्वास नांगरे पाटील यांनी सर्व पोलीस स्टेशन मधील संबंधित अधिकाऱ्यांना काटेकोरपणे नियमांचं पालन करून घेण्याचे आदेश दिले तर नागरिकांना सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाच्या आदेशाचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)