एक्स्प्लोर
मुंबईत पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचा खून
मुंबई : मुंबईतील वाकोल्यात पोलिस निरीक्षकाच्या पत्नीची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. मारेकरी घरातलाच आहे की बाहेरचा याचा तपास पोलिस करत आहेत.
मंगळवारी हा खून झाला. खार पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर गनोरे हे सांताक्रूझच्या प्रभात कॉलनीतील आपल्या घरी आले असताना, त्यांना घराचा दरवाजा बंस दिला. त्यांनी पत्नी दीपाली गनोरे यांना कॉल केला असता, फोन बंद लागला. यानंतर गनोरे यांनी दरवाजा उघडला. यावेळी त्यांना पत्नी रक्ताच्या थारोळ्यात आढळल्या.
पोलिस निरीक्षकांनी त्वरित 100 क्रमांकावर कॉल करुन हत्येची माहिती दिली. हत्या झाली तेव्हा दीपाली गनोरे घरात एकट्याच होत्या. यानंतर दीपाली गनोरे यांना तातडीने व्ही एस देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पण तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
दरम्यान, हत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. वाकोला पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 302 अंतर्गत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस हत्येचा शोध घेत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बीड
क्राईम
राजकारण
Advertisement