एक्स्प्लोर
हिंमत असेल तर पकडून दाखवा, पोलिसांना आव्हान देण्याऱ्या स्मार्ट चोरट्याला अखेर बेड्या
पोलिसांना आव्हान देणारा हा चोरटा गेले अनेक महिने गुंगारा देत होता. अखेर पोलिसांनी विशेष टीम बनवत या चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत.

मुंबई : पोलिसांना चॅलेंज देत जामिनावर सुटलेल्या स्मार्ट चोराला पुन्हा बेड्या ठोकण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. पकडू शकत असाल तर पकडून दाखवा असं आव्हानच या अट्टल चोराने पोलिसांना दिलं होतं. या स्मार्ट चोराने आजपर्यंत लॅपटॉप, मोबाईल, आयपॅडसारख्या महागड्या सामानाची चोरी केली आहे. सोनू बनिया कुमार असं या चोराचं नाव आहे. आरोपी सोनू कुमारने पोलिसांना आव्हान दिल्यानंतर आपला साथीदार सुनील कुमारसोबत मुंबईतील शिवडी परिसरात एका कारची काच तोडून महागडा ऐवज लंपास केला. कारच्या आत असलेले पैसे, लॅपटॉप, आयपॅडसह अन्य सामानाच्या चोरीनंतर पुन्हा मुंबई पोलिसांना या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. या स्मार्ट चोराविरोधात भायखळा, आझाद मैदान, एमआरए मार्ग, व्हिपी रोड, माणिकपुरा आणि ठाणे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. मुंबई पोलिसांनी आपली एक विशेष टीम या चोराच्या मागावर तैनात केली होती. या चोराने जेलमध्ये असताना चोरीचे अनेक फंडे शिकून घेतले होते. तसंच पोलिस कसं काम करतात यावरही या चोरट्याची नजर असायची. पोलिसांना आव्हान देणारा हा चोरटा गेले अनेक महिने गुंगारा देत होता. अखेर पोलिसांनी विशेष टीम बनवत या चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
महाराष्ट्र
सोलापूर























