एक्स्प्लोर
देवनार डम्पिंग ग्राऊंड आग: आणखी चार भंगार विक्रेत्यांना अटक
मुंबई : देवनार डम्पिंग ग्राऊंडच्या आगीप्रकरणी आणखी चार भंगार विक्रेत्यांना मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे अटक झालेल्यांची संख्या 13 झाली आहे.
पोलिसांनी शनिवारी 9 भंगार विक्रेत्यांना अटक केली होती. या 9 जणांना कुर्ला कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. भंगारातील लोखंडासाठी या विक्रेत्यांनी ही आग लावल्याचा संशय पोलिसांना आहे.
भंगारासाठी देवनार डम्पिंगला आग लावल्याचा आरोप, 9 भंगार विक्रेत्यांना अटक
तसंच भंगारविक्रेत्यांनी परिसरात राहणाऱ्या लहान मुलांचाही वापर या कामात केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. अटक करण्यात आलेल्या या 9 भंगारविक्रेत्यांची दुकानं देवनार डम्पिंग ग्राऊंडला लागूनच आहेत, त्यातचं या विक्रेत्यांकडे कोणत्याही प्रकारचा अधिकृत परवाना नसल्याचंही कळतं.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement