एक्स्प्लोर

HDFC Bank : एचडीएफसी बँकेचा नियम बदलाचा धडाका सुरुच, चार रोख व्यवहारानंतर 150 रुपये द्यावे लागणार

HDFC Bank Rule Change :एचडीएफसी बँकेनं रोख व्यवहारांसंदर्भातील नियम बदलला आहे. चारपेक्षा अधिक रोख व्यवहार केल्यास 150 रुपयांचं शुल्क प्रति व्यवहार द्यावं लागणार आहे.

नवी दिल्ली : एचडीएफसी बँकेनं बचत खात्यातील रोख व्यवहारांसंदर्भात नियमांमध्ये बदल केला आहे. एचडीएफसी बँकेच्या बचत खातेदारांना दरमहा स्वत : किंवा त्रयस्थातर्फे बँक खात्यात 1 लाख रुपयांपर्यंत रक्कम भरता येईल. यापूर्वी ही रक्कम 2 लाख रुपये होती. बचत खात्यात रोख रक्कम जमा करण्यासंदर्भातील मर्यादा पूर्वीप्रमाणेच 4 व्यवहार अशी आहे. मात्र, आता त्यानंतरच्या प्रत्येक रोख व्यवहारावर 150 रुपये शुल्क आकारलं जाईल. बँकेच्या या निर्णयाचा थेट परिणाम मध्यमवर्गीय आणि कमी उत्पन्न असणाऱ्या खातेंदारांवर होणार आहे. यासह इतर नियम 1 ऑगस्टपासून लागू होणार आहेत.

त्रयस्थ व्यक्तीकडून करण्यात येणारे रोख व्यवहार म्हणजे खातेदाराऐवजी दुसऱ्या व्यक्तीनं बँक खात्यात पैसे जमा करणे किंवा काढणे. यामध्ये नातेवाईक, मित्र किंवा प्रतिनिधीचा समावेश असू शकतो. एचडीएफसी बँकेच्या या निर्णयानुसार चार व्यवहारांनंतरच्या प्रत्येक व्यवहारावर 150 रुपये शुल्क आकारलं जाईल. मोफत व्यवहारांची मर्यादा संपल्यानंतर किमान प्रति 1000 रुपयांसाठी 5 रुपये किंवा 150 रुपये या प्रमाणात शुल्क आकारलं जाईल. त्रयस्थ व्यक्तीकडून करण्यात येणाऱ्या रोख रकमेच्या व्यवहारांची मर्यादा 25000 रुपये इतकी आहे.

एचडीएफसी बँकेनं इतर व्यवहारांवरील शुल्क देखील बदललं आहे.

एनईएफटी व्यवहार शुल्क

10000 रुपयांपर्यंत : 2 रुपये

10 हजार ते 1 लाख रुपये : 4 रुपये

1 लाख ते 2 लाख रुपये : 6 रुपये

2 लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचे व्यवहार : 24 रुपये

आरटीजीएसद्वारे पैसे पाठवण्यावरील शुल्क

2 लाख ते 5 लाख रुपये : 20 रुपये

5 लाखांपेक्षा अधिक रक्कम : 45 रुपये

आयएमपीएसद्वारे केले जाणार व्यवहार

1000 रुपयांपर्यंत : 2.50 रुपये

1 हजार ते 1 लाख रुपये : 5 रुपये

1 लाखांपेक्षा अधिक रक्कम : 15 रुपये

ईसीएस आणि एसीएच रिटर्न चार्जेस : इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टीमचे व्यवहार फेल झाल्यास पहिल्यावेळी 450 रुपये, दुसऱ्यावेळी 500 आणि तिसऱ्या वेळी 550 रुपये शुल्क आकारलं जाईल.

एचडीएफसी बँकेकडून शिल्लक प्रमाणपत्र, व्याज प्रमाणपत्र आणि पत्त्याची पडताळणी यासाठी 100 रुपये शुल्क आकारलं जाईल. तर, ज्येष्ठ नागरिकांसाठी 90 रुपये शुल्क असेल. जुन्या रेकॉर्डची कॉपी आणि चेकची प्रत यासाठी 80 रुपये शुल्क आकारलं जाईल.

एचडीएफसी बँकेकडून प्रत्येक वर्षात बचत खातेदाराला 10 पानांचं चेकबुक दिलं जाईल. यापूर्वी खातेदारांना 25 पानांचं चेकबुक दिलं जायचं. यानंतर अतिरिक्त प्रत्येक पानासाठी 4 रुपये शुल्क द्यावं लागेल.

दरम्यान, एचडीएफसी बँकेनं आयसीआयसीआय बँकेनंतर किमान मासिक सरासरी शिल्लक रकमेच्या नियमात बदल केल्याबाबत चर्चा सुरु होत्या. मात्र, एचडीएफसी बँकेनं किमान शिल्लक रक्कम नियमात बदल केला नसल्याचं म्हटलं आहे.  

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
Embed widget