Mumbai News : ठाकरे गटातल्या कार्यकर्त्यांची पालिका कर्मचाऱ्याला मारहाण, अनिल परबांसह 25 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल
ठाकरे गटाकडून मुंबई महानगरपालिका एच/पूर्व विभाग कार्यालयावर काल मोर्चा काढण्यात आला होता. याच मोर्चादरम्यान ठाकरे गटातल्या काही कार्यकर्त्यांनी पालिका अधिकाऱ्याला मारहाण केली होती.
मुंबई : ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मुंबई पालिका कर्मचाऱ्याला (Mumbai municipal corporation) मारहाण केल्याप्रकरणी आमदार अनिल परब यांच्यासह 20 ते 25 कार्यकर्त्यांविरोधात वाकोला पोलीस ठाण्यात (vakola police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या तक्रारीनंतर मध्यरात्री वाकोला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चार जणांना अटक
ठाकरे गटाकडून मुंबई महानगरपालिका एच/पूर्व विभाग कार्यालयावर काल मोर्चा काढण्यात आला होता. याच मोर्चादरम्यान ठाकरे गटातल्या (Thackeray Group) काही कार्यकर्त्यांनी पालिका अधिकाऱ्याला मारहाण केली होती. याच मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल परब (Anil Parab) यांचा निकटवर्तीय असलेला माजी नगरसेवक हाजी अलीम शेख, विधानसभा संघटक माजी नगरसेवक सदा परब, उदय दळवी, संतोष कदम या चार जणांना वाकोला पोलिसांनी मध्यरात्री अटक केली आहे. सध्या वाकोला पोलिसांनी इतर फरार सर्व आरोपींच्या मध्यरात्रीपासून धरपकड सुरू केली आहे. कलम 353, 332, 506 आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे
नेमकं काय घडले?
शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वांद्रे पूर्व परिसरातील शाखा अनधिकृत असल्याचा ठपका ठेवून त्या शाखेच्या बांधकामावर जेसीबी चालवून नुकतीच कारवाई करण्यात आली होती. आता त्या शाखेच्या कारवाईवरूनच मोठा वाद पेटला आहे. शाखेवर तोडक कारवाई करताना त्या शाखेतला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवरायांचा फोटो न काढता हातोडा मारल्यानं ठाकरे गट संतप्त झाला. ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी शाखा पाडण्याच्या वेळी उपस्थित अधिकाऱ्याला या प्रकरणात जाब विचारण्याचा प्रयत्न केला. ही घटना मुंबई महापालिकेच्या एच पूर्व विभाग कार्यालयात घडली. आणि त्यावेळी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी त्या अधिकाऱ्याला मारहाण केली.
अधिकारी आज आंदोलन करणार
महापालिका अधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी महापालिका अधिकारी आज आंदोलन करणार आहे. काल शिवसैनिकांनी वॉर्ड ऑफिसरला शाखा तोडल्यामुळे मारहाण केली होती. महापालिका एच ईस्ट वॉर्ड परिसरात हे आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजता म्युनिसिपल मजदूर युनियन व म्युनिसिपल इंजिनीयर असोशियन संघटनेतर्फे हे आंदोलन करण्यात येणार आहे. ठाकरे गटाकडून मुंबई महानगरपालिका एच/पूर्व विभाग कार्यालयावर काल मोर्चा काढण्यात आला होता.
हे ही वाचा :