(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai News: पाणीपुरवठा सुरळीत होण्यास आठ तासांचा विलंब, संध्याकाळी 6 वाजता होणार पाणीपुरवठा पूर्ववत
संध्याकाळी सहा वाजता पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या 24 विभागांपैकी 12 विभागातील पाणीपुरवठा पूर्णतः बंद करण्यात आला आहे.
Mumbai: पाणी पुरवठ्याबाबत मुंबईकरांसाठी (Mumbai News) महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबईचा पाणीपुरवठा (Mubai Water Supply) सुरळीत होण्यास आठ तासांचा विलंब होणार आहे. आज सकाळी 10 पासून पाणीपुरवठा सुरळीत होणे अपेक्षित होते मात्र दुरुस्ती कामांना विलंब झाल्यानं पाणीपुरवठा सुरळीत होण्यास उशीर होणार आहे.
भांडुप (Bhandup) संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रास अतिरिक्त 4,000 मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम महानगरपालिकेद्वारे (Mumbai Corporation) हाती घेतले आहे. तसेच जल वाहिन्यांवर 2 ठिकाणी झडपा बसविणे, नवीन जलवाहिन्यांची जोडणी करणे ही कामे देखील करण्यात येणार आहे. तब्बल 42 वर्षानंतर प्रथमच 24 तासांसाठी बंद ठेवण्यात आले होते. ही सर्व कामे पूर्ण करीत असताना त्या दरम्यान बऱ्याच तांत्रिक अडचणी आल्या आहेत. त्यामुळे कामे पूर्ण करून 1910 दश लक्ष लीटर प्रति दिन क्षमतेचे जल शुद्धीकरण केंद्र, केंद्रापर्यंत येणाऱ्या व केंद्रापासून पुढे जाणाऱ्या सर्व जल वाहिन्या पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी आठ तासांचा अतिरिक्त कालावधी लागणार आहे. त्यामुळे संध्याकाळी सहा वाजता पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या 24 विभागांपैकी 12 विभागातील पाणीपुरवठा पूर्णतः बंद करण्यात आला आहे.
जाहीर सूचना
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) January 31, 2023
बृहन्मुंबई महानगरपालिका जल अभियंता खात्याची मुंबईकरांना महत्वाची सूचना!#MyBMC #MyBMCUpdates pic.twitter.com/PbPnG2br0t
पश्चिम उपनगरातील के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण, पी उत्तर, आर दक्षिण, आर मध्य, आर उत्तर, एच पूर्व आणि एच पश्चिम या 9 विभागांमधील अनेक परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित असणार आहे. तर पूर्व उपनगरातील एस विभाग, एन विभाग आणि एल विभागातील अनेक भागात देखील पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित असणार आहे. नागरिकांना होणाऱ्या गैससोयीबद्दल प्रशासनाने दिलगीरी व्यक्त केली आहे. तसेच पालिका प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
तर 'जी उत्तर' आणि 'जी दक्षिण' या 2 विभागातील माहीम पश्चिम (Mahim West) , दादर पश्चिम (Dadar West) , प्रभादेवी (Prabhadevi) व माटुंगा पश्चिम (Mantunga West) या परिसरातील पाणीपुरवठ्यात 25 टक्के कपात करण्यात आली. तर धारावी परिसरातील ज्या भागात दुपारी 4 ते सायंकाळी 9 या दरम्यान पाणीपुरवठा होतो. त्या भागात 30 जानेवारी 2023 रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला.
इतर महत्त्वाच्या बातम्या :