मुंबई-नाशिक महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा, खासदार बाळ्या मामा उतरले रस्त्यावर, म्हणाले ठेकेदारांना नागरिकांनी ठोकून काढावे!
भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावर सदैव वाहतूक कोंडी होत असल्याने या भागातील ग्रामस्थ त्रस्त असून खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा हे स्वतः वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत.
ठाणे : मुंबई - नाशिक महामार्गावरील (Mumbai- Nashik Highway) भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावर हा सदैव वाहतूक कोंडीत गुदमरून गेलेला आहे.खारेगाव टोल नाका ते वडपे या आठ पदरी होत असलेल्या रस्त्यावर संथगतीने होत असलेले रस्ता रुंदीकरणाची कामे व वाहतूक पोलिसांचे नियोजन नसल्याने प्रचंड वाहतूक कोंडीचा मनस्ताप या रस्त्यावरून प्रवास करणारे वाहन चालक प्रवासी यांना सोसावा लागत आहे. वडपे ते खारीगाव खाडी पुलापर्यंत तब्बल आठ ते दहा किलोमीटर पर्यंत मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गीकेवर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.यामुळे या वाहतूक कोंडीत अनेक प्रवासी अडकून पडले होते.
भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावर सदैव वाहतूक कोंडी होत असल्याने या भागातील ग्रामस्थ त्रस्त असून खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा हे स्वतः वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. वाहतूक पोलिसांच्या सोबतीने वाहतूक सोडवणुकीचा प्रयत्न करीत असताना दिसून आले.त्यांनी या वाहतूक कोंडीस वाहतूक पोलिसांचे नियोजन नसल्याने होत असल्याचा ठपका ठेवला आहे.त्या सोबत या रस्त्याचे काम संथ गतीने करणारे राजाश्रय असलेले ठेकेदार जबाबदार आहेत.या ठेकेदारांना नागरिकांनी ठोकून काढण्याची वेळ आली आहे.त्यामुळे लवकरच या ठेकेदारांना रस्त्यावर बोलावून त्यांना जाब विचारणार असा इशारा खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी दिला आहे.
डागडुजी पण परिस्थिती जैसे थे...
नाशिक मुबंई महामार्गावरील खड्ड्याच्या समस्याला दरवर्षी सामोरे जावं लागते. नेहमीच येतो पावसाळा प्रमाणे दरवर्षी दरवर्षी खड्ड्याच्या समस्यावरून बैठका होतात. तात्पुरती डागडुजी केली जाते मात्र त्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसें थेच होते. पावसाळ्यात राजकीय नेते रेल्वे, विमानाचा प्रवास करतात, विरोधी पक्ष आंदोलन करतात. सत्ताधारी सरकारच्या भूमिकाचे समर्थन करतात आणि जनता मात्र खड्यामधून हेलकावे घेत, जीव मुठीत धरून प्रवास करतात. ही परिस्थिती याही वर्षी कायम आहे. जेव्हा जनतेतून उठावाची तयारी सुरू2झाली बांधकाम, उद्योजक आशा विविध 43 संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला त्यानंतर सरकारला जाग आली बैठकांच सत्र सुरू झाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठोपाठ नाशिकच पालकमंत्री दादा भुसे यांनी बैठक घेतली अजित पवारांनी 10 दिवसात रस्ताच्या कामात सुधारणा करा अन्यथा कारवाईला सामोरे जा असे आदेश दिलेत आहेत.
मंत्र्यांच्या आदेशाला कशी केराची टोपली
उपमुख्यमंत्री यांचा इशारा, बैठकांचे सत्र या नंतर ही रस्त्याच्या कामात सुधारणेला सुरवात नाही, एबीपी माझां ने नाशिक आणि ठाणे दोन्ही जिल्ह्यात रियालिट चेक केला असता प्रशासनाच्या दाव्याची पोलखोल झाली, मंत्र्यांच्या आदेशाला कशी केराची टोपली दाखवली जाते हे समोर आले.