एक्स्प्लोर

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपचं उत्तर भारतीय कार्ड, फेरीवाला धोरणांवरुन आक्रमक होण्याची शक्यता

भाजपचे उत्तर भारतीय नेते राजहंससिंह यांनी पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांची भेट घेतली. अद्याप फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी का होत नाही, असा सवाल करत आक्रमक  होण्याचाही इशारा दिला आहे.  

मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर आता भाजपचं पुढचं लक्ष्य सेनेच्या ताब्यातली मुंबई महापालिका आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने आता उत्तर भारतीय कार्ड बाहेर काढले आहे. मुंबईत रखडलेल्या फेरीवाला धोरणावरुन भाजपनं फेरीवाल्यांकरता आक्रमक होण्याचा इशारा दिला आहे.  

मुंबईत फेरीवाल्यांवरुन होणारं राजकारण नवं नाही हातावर पोट असलेले फेरीवाले ते मुजोर ,फुटपाथ अडवणारे, अतिक्रमण करणारे फेरीवाले अशी टोकाची मतं यापूर्वीही मांडली गेली आहेत. फेरीवाल्यांविरोधात मनसेनं यापूर्वी फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर फेरीवाल्यांविरोधात खळ्ळखट्याक आंदोलनही केलं. आता भाजप मात्र फेरीवाल्यांच्या बाजूनं मैदानात उतरले आहे. नुकतीच भाजपचे उत्तर भारतीय नेते राजहंससिंह यांनी पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांची भेट घेतली. अद्याप फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी का होत नाही, असा सवाल करत आक्रमक  होण्याचाही इशारा दिला आहे.  

 सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारने सन 2014 मध्ये फेरीवाला कायद्याच्या अंमलबजावणीचे निर्देश राज्य सरकारला दिले. मात्र तब्बल आठ वर्षांनंतरही मुंबई महापालिका उदासीन आहे, असा दावा भाजपने केला आहे. धोरणाची अंमलबजावणी न करता फेरीवाल्यांवर कारवाई केली जात आहे असाही भाजपचा आरोप आहे..

मुंबईत  काँग्रेसकडून 'यूपी कार्ड'साठी प्रयत्न सुरू होण्याआधीच भाजपने ही मते आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, फेरीवाला धोरणाचा वापर राजकारणासाठी होऊ शकत नाही, असं शिवसेनेचं म्हणणे आहे. 

  •  पालिकेने सन 2014 मध्ये केलेल्या सर्वेक्षणात : 1 लाख 28 हजार 444 फेरीवाले
  • संपूर्ण मुंबईतून आलेले फेरीवाल्यांचे अर्ज : 99 हजार 435
  •  छानणीनंतर 15 हजार 361  फेरीवाले पात्र
  • संपूर्ण मुंबईतून आलेले फेरीवाल्यांचे अर्ज  - 99 हजार 435
  •  छानणीनंतर 15 हजार 361 फेरीवाले पात्र

 उच्च न्यायालयाने रेल्वे स्थानकापासून 150  मीटरपर्यंतच्या अंतरात फेरीवाल्यांना बसवण्यास मनाई केली आहे.  मुंबईत या नियमाचं सर्रास उल्लघंन होतं.  रेल्वे स्थानक तसेच अन्य ठिकाणी फेरीवाल्यांनी मोकळ्या जागा, रस्ते, फूटपाथवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण होतं. मात्र, मुंबईच्या दशेपेक्षा चर्चा फेरीवाला मुद्द्यावरुन रंगणा-या राजकारणाच्या दिशेचीच जास्त होतं.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
पुन्हा ट्रान्सफर... IAS जी श्रीकांत यांची 15 दिवसांत दुसरी बदली; राज्यातील 4 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
पुन्हा ट्रान्सफर... IAS जी श्रीकांत यांची 15 दिवसांत दुसरी बदली; राज्यातील 4 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

व्हिडीओ

Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report
Women Reservation : महिला आरक्षण विधेयकावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने Special Report
Nashik TCS : नाशिकच्या टीसीएसप्रकरणी रिसॉर्टवर कारवाई, कारागृहात धुलाई Special Report
Ayan Ahmad Amravati : रील स्टार अयान अहमद कसा बनला गुन्हेगार? Special Report
Bhondu Baba : मुंबईच्या मालाडमधील भोंदूबाबाचा पर्दाफाश Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shreyas Iyer : सरपंच श्रेयस अय्यरची सीमारेषेवर अफलातून उडी, यानसेनच्या साथीनं हार्दिक पांड्याचा करेक्ट कार्यक्रम, रोहित-सूर्या पाहत राहिले, पाहा व्हिडिओ
श्रेयस अय्यरची सीमारेषेवर अफलातून उडी, यानसेनची अचूक साथ, रोहित-सूर्या पाहत राहिले
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इस्त्रायल-लेबनॉनच्या शस्त्रसंधीची घोषणा, दोन्ही देशांचे नेते 34 वर्षानंतर भेटले
ट्रम्प यांच्याकडून आणखी एका युद्धाच्या शस्त्रसंधीची घोषणा, इस्त्रायल-लेबनॉन संघर्षाला 10 दिवस ब्रेक
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
MI vs PBKS : वानखेडेवर पंजाबच्या प्रभसिमरन आणि श्रेयस अय्यरचं वादळ,  पंजाबचा 7 विकेटनं मुंबईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत टॉपवर
पंजाबचा 7 विकेटनं मुंबईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत टॉपवर,वानखेडेवर प्रभसिमरन आणि श्रेयसचं वादळ
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
Suryakumar Yadav : रोहित दुखापतीमुळं संघाबाहेर सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद, अर्शदीप सिंगचा धमाका
सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद,अर्शदीप सिंगचा धमाका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
Embed widget