Mumbai News : मुंबईकरांना पाणी उकळून पिण्याचं महानगरपालिकेचे आवाहन, पुढील 24 तास गढूळ पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता
Mumbai News : मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीच्या अनुषंगाने तज्ज्ञांच्या समितीने पाहणी केली असून आता पुढील काही दिवस मुंबईकरांना पाणी उकळून पिण्याचे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आलं आहे.
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे (BMC) मलबार हिल (Malabar Hill) जलाशयाची पुनर्बांधणी विचाराधीन आहे. त्याचसाठी आयआयटी, पवईचे प्राध्यापक, स्थानिक तज्ज्ञ नागरिक, महानगरपालिका अधिकारी यांचा समावेश असलेल्या तज्ज्ञ समितीने मलबार हिल जलाशयामधील कप्पा क्रमांक 2 अ आणि 2 ब ची पाहणी केली. गुरुवार 7 डिसेंबर रोजी ही पाणी करण्यात आली. त्याचसाठी जलाशयाचा कप्पा क्रमांक 2 हा रिकामा करण्यात आला होता.दरम्यान पाहणीसाठी रिकामा करण्यात आलेला हा कप्पा हा पुन्हा भरण्यात आलाय. त्यामुळे पुढील काही मुंबईकरांना गढूळ पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता आहे. म्हणून मुंबईकरांना पाणी उकळून पिण्याचे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आलंय.
मलबार हिल जलशयाच्या प्रस्तावाचे पुनरावलोकन करुन तज्ज्ञांच्या समितीने योग्य कार्यपद्धती सुचविणे अपेक्षित आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत जलाशयाच्या उर्वरित भागाची पाहणी करण्याचा विचार सध्या सुरु आहे. या तज्ज्ञांच्या समितीचा पहिला टप्पा हा आज पार पडला. सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत जलाशयाची अंतर्गत पाहणी करण्यात आलीये.
पाणी उकळून पिण्याचे आवाहन
या पाहणी दरम्यान जलाशयाचा कप्पा रिकामा करण्यात आला होता. त्यामुळे शहरातील काही भागात पाणी कपात तर कुठे पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्यामध्ये ए, सी, डी, जी उत्तर, जी दक्षिण विभागांचा समावेश होता. ता. जलाशयातील कप्पा पूर्ण रिक्त करुन पुन्हा भरण्यात आला आहे. त्यामुळे काही विभागातील नागरिकांना एका दिवसासाठी म्हणजेच 24 तासांसाठी गढूळ पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता आहे. सध्या आजारांचे प्रमाण लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून म्हणून नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलीये.
'या' भागात पाणीपुरवठा खंडीत
मुंबई महानगरपालिकेच्या मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाच्या अनुषंगाने तज्ज्ञ समितीकडून पाहणी आली. त्यामुळे मुंबईकरांनी 7 डिसेंबर रोजी होणारा पाणीपुरवठा खंडीत करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली होती. तर पाणी जपून वापरावे असे आवाहन मुंबई महापालिकेच्यावतीने करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेच्या ‘ए’ विभाग, सी विभाग, डी विभाग, जी उत्तर आणि जी दक्षिण विभागातील पाणी पुरवठा हा खंडीत करण्यात आला तर काही ठिकाणी पाणी कपात करण्याच निर्णय घेण्यात आलाय.
हेही वाचा :
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाईपलाईनद्वारे जाणार पाणी; देशातील पहिला प्रयोग