एक्स्प्लोर

BMC Election 2022 : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण

राज्यपालांच्या सहीला वेळ लागला तरी आगामी अधिवेशनात कायदा मंजूर करुन मुंबईतल्या वॉर्डची संख्या 227 वरुन 236 वर जाणार आहे.

 मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकासाठी प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मुंबईतील वाढीव वॉर्डचा आरखडा तयार करण्यात आला आहे. वाढीव नऊ वॉर्डच्या अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी होण्याची प्रतीक्षा आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

राज्यपालांच्या सहीला वेळ लागला तरी आगामी अधिवेशनात कायदा मंजूर करुन मुंबईतल्या वॉर्डची संख्या 227 वरुन 236 वर नेता येणार आहे. मुदतीत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याकरता प्रशासन सक्षम आहे.  

मुंबईतले नवे नऊ वॉर्ड कोणते?

  • पश्चिम उपनगरे येथे 4 ते 5 वॉर्ड वाढणार
  • पूर्व उपनगरांत 3 ते 4 वॉर्ड वाढणार 
  • मुंबई शहरात  1 वॉर्ड वाढणार

ज्या ठिकाणी नव्या इमारती, वस्त्या,तसेच लोकसंख्येची घनता वाढली आहे. त्या ठिकाणी नवे वॉर्ड तयार होणार आहे.  ओबीसी आरक्षणासंदर्भात निर्माण झालेला प्रश्न मुंबई महापालिका निवडणूकीत मात्र अडथळा ठरु शकत नाही. कारण, मुंबईत ओबीसींकरता राखीव सीटची संख्या मर्यादित आहे.

दरम्यान आगामी 15 महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता आहे. या होऊ घातलेल्या निवडणुका केवळ आणि केवळ राजकीय फायद्यासाठी आता पुढे ढकण्याची शक्यता आहे आणि अशी कुजबुज आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.  विशेष म्हणजे प्रशासन या सगळ्या निवडणूक प्रक्रियेसाठी सज्ज आहे. पण केवळ राजकारणांकडून आपल्या राजकीय फायद्यासाठी 15 पालिकांची निवडणूक पुढे ढकलण्याची शक्यता आहे. 

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 2001 ते 2011 या दशकात लोकसंख्येत 3.87 टक्के वाढ झालीय. लोकसंख्येमध्ये झालेली ही वाढ आणि वाढते नागरीकरण या गोष्टींचा विचार करून प्रतिनिधीत्व निश्चित करणे आवश्यक होते. त्यानुसार निर्वाचित सदस्यांची संख्या वाढविण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार निर्वाचित सदस्य म्हणजेच नगरसेवकांची संख्या 236 अशी करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे

मुंबई महापालिकेचा कार्यकाळ फेब्रुवारी 2022 मध्ये संपतो आहे. त्यामुळे निवडणुकीला आता अवघ्या काही महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिलाय. मुंबई महापालिका निवडणुकीत मुख्य स्पर्धा ही शिवसेना विरूद्ध भाजप अशी राहणार आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना एकत्रित लढणार आहेत. तर, कॉंग्रेस स्वतंत्रपणे ही निवडणूक लढविणार असल्याची घोषणा काँग्रेस नेत्यांकडून केली जात आहे.
 
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

संबंधित बातम्या :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमार्ट अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमार्ट अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
Nashik : प्रजासत्ताक दिनी वनमजुराने डिझेल ओतून स्वतःला पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
प्रजासत्ताक दिनी वनमजुराने डिझेल ओतून स्वतःला पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
रणजी सामन्यात महाराष्ट्राची बडोदा संघावर मात, 439 धावांनी मोठा विजय; सौरभचे धुव्वादार शतक
रणजी सामन्यात महाराष्ट्राची बडोदा संघावर मात, 439 धावांनी मोठा विजय; सौरभचे धुव्वादार शतक
Howrah Train Accident : रेल्वे अपघाताची मालिका सुरुच; आता तिरुपती एक्स्प्रेसला रेल्वेची धडक; 3 डबे रुळावरून घसरले
रेल्वे अपघाताची मालिका सुरुच; आता तिरुपती एक्स्प्रेसला रेल्वेची धडक; 3 डबे रुळावरून घसरले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines:  शंभर हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 26 January 2025ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 26 January 2024 Latest NewsABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 26 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमार्ट अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमार्ट अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
Nashik : प्रजासत्ताक दिनी वनमजुराने डिझेल ओतून स्वतःला पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
प्रजासत्ताक दिनी वनमजुराने डिझेल ओतून स्वतःला पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
रणजी सामन्यात महाराष्ट्राची बडोदा संघावर मात, 439 धावांनी मोठा विजय; सौरभचे धुव्वादार शतक
रणजी सामन्यात महाराष्ट्राची बडोदा संघावर मात, 439 धावांनी मोठा विजय; सौरभचे धुव्वादार शतक
Howrah Train Accident : रेल्वे अपघाताची मालिका सुरुच; आता तिरुपती एक्स्प्रेसला रेल्वेची धडक; 3 डबे रुळावरून घसरले
रेल्वे अपघाताची मालिका सुरुच; आता तिरुपती एक्स्प्रेसला रेल्वेची धडक; 3 डबे रुळावरून घसरले
मोबाईलच्या स्क्रीनगार्डवरुन वाद; चौघांकडून कामगाराचा खून, पोलिसांनी फिरवली तपासाची च्रके
मोबाईलच्या स्क्रीनगार्डवरुन वाद; चौघांकडून कामगाराचा खून, पोलिसांनी फिरवली तपासाची च्रके
Nashik News : वडिलांच्या निधनानंतर मुलीनं उचललं टोकाचं पाऊल, अंगावर रॉकेल टाकलं अन्...; बाप-लेकीची एकाच घरातून निघाली अंत्ययात्रा, नाशिकमधील घटना
वडिलांच्या निधनानंतर मुलीनं उचललं टोकाचं पाऊल, अंगावर रॉकेल टाकलं अन्...; बाप-लेकीची एकाच घरातून निघाली अंत्ययात्रा, नाशिकमधील घटना
Virat Kohli : देर लगी आने में तुमको, शुक्रर हैं फिर भी आये तोह, किंग कोहली तब्बल 13 वर्षांनी रणजीत दिसणार, दिल्लीकडून जंगी तयारी, 10 हजार जणांना एन्ट्री ते...!
देर लगी आने में तुमको, शुक्रर हैं फिर भी आये तोह, किंग कोहली तब्बल 13 वर्षांनी रणजीत दिसणार, दिल्लीकडून जंगी तयारी, 10 हजार जणांना एन्ट्री ते...!
2300 विद्यार्थ्यांनी साकारले देशातील सर्वात मोठे '26 जानेवारी'; 41,800 स्क्वेअर फूटचा 'वर्ल्ड रेकॉर्ड'
2300 विद्यार्थ्यांनी साकारले देशातील सर्वात मोठे '26 जानेवारी'; 41,800 स्क्वेअर फूटचा 'वर्ल्ड रेकॉर्ड'
Embed widget