अवाजवी बीले आकारणी प्रकरणात 37 खाजगी रुग्णालयांना मुंबई महापालिकेचा दणका
आजपर्यंत 2,115 प्रकरणे मिळून 1 कोटी 46 लाख 84 हजारांची रक्कम रुग्णांना परत मिळाली आहे.कोरोना उपचारांशी संबंधित उपचार शुल्क आकारणी सुमारे 10.50 टक्क्यांनी कमी झाली आहे.
मुंबई : कोरोना विषाणू उपचारांसाठी खासगी रुग्णालयांकडून अवाजवी आकारणी (बील) होत असल्याच्या तक्रारींची मुंबई महापालिकेने गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने विविध खासगी रुग्णालयांसाठी महापालिका मुख्य लेखापरीक्षक खात्यातील, लेखापरीक्षकांची नेमणूक केली आहे. तेव्हापासून आजपर्यंत 37 रुग्णालयांतील 625 तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे.
तसेच इस्पितळात नेमून दिलेल्या लेखा परीक्षकांनी अन्य 490 तक्रारींमध्ये देखील कार्यवाही केली आहे. अशा एकूण 1 हजार 115 तक्रार प्रकरणात नियमानुसार कार्यवाही केल्याने सुमारे 1 कोटी 46 लाख 84 हजार रुपये रकमेची आजवर परतफेड करण्यात आली आहे. यातून रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळाला आहे.
10.48 टक्क्यांनी देयकांची रक्कम कमी होवून रुग्णांना दिलासा या 1,115 प्रकरणातील मूळ देय रक्कम एकूण 14.01 कोटी रुपये इतकी होती. या प्रकरणांमध्ये झालेल्या तक्रारी आणि सूचना यांचा विचार करून लेखापरीक्षक अधिकाऱ्यांनी सर्व नियम तपासून कार्यवाही केली. तपासणी आणि पडताळणी अंती या देयकांची योग्य फेर आकारणी करण्याच्या सूचना रुग्णालयांना देण्यात आल्या. परिणामी या सर्व प्रकरणातील बिलांची रक्कम कमी होऊन 12.54 कोटी रुपये इतकी झाली. मूळ देयक आकारणीचा विचार करता सुमारे 10.48 टक्क्यांनी देयकांची रक्कम कमी होवून रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
आधीच्या आदेशात आणखी सुधारणा बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील 'कोविड कोरोना 19'ची बाधा झालेल्या रुग्णांना अधिकाधिक परिणामकारक वैद्यकीय सेवा सुविधा मिळाव्यात, म्हणून राज्य शासनाच्या निर्देशांनुसार खासगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा महानगरपालिकेने ताब्यात घेण्याचे ठरविले. या 80 टक्के खाटांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून कोणत्या दराने शुल्क आकारणी केली पाहिजे याबाबत राज्य शासनाने दिनांक 30 एप्रिल 2020 रोजी आदेश काढला. या आदेशात आणखी सुधारणा करून सुधारित आदेश दिनांक 21 मे 2020 रोजी जारी करण्यात आले.
राज्यातील जवळपास 1300 डॉक्टरांचा आंदोलनाचा पवित्रा
या आदेशान्वये निर्धारित केलेल्या दरानुसार संबंधित रुग्णालयांनी शुल्क आकारणी करणे गरजेचे आहे. असे असले तरी खासगी रुग्णालये अवाजवी आकारणी करीत असल्याच्या तक्रारी होऊ लागल्या. यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार प्रशासनाने, खासगी रुग्णालयांमध्ये सरकारी दरानुसारच शुल्क आकारणी केली जात असल्याची खातरजमा योग्य प्रकारे व्हावी, यासाठी महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षक खात्यातील प्रत्येकी 2 अधिकाऱ्यांची नियुक्ती ही खासगी रुग्णालयांसाठी केली आहे. या नियुक्तीमुळे बिल आकारणी बाबत तक्रारींचा निपटारा होत आहे. तसेच पूर्वीच्या तुलनेत तक्रारींचा ओघ बऱ्याच अंशी कमी करण्यात यश आले आहे.एखाद्या खासगी रुग्णालयाबाबत रुग्णांना किंवा रुग्णांच्या आप्तांना काही तक्रार किंवा सूचना करावयाची असल्यास त्यासाठीचा पर्याय देखील महानगरपालिकेने उपलब्ध करून दिला आहे. यासाठी संबंधित खासगी रुग्णालयासाठी ज्या सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्या अधिकार्यांकडे ईमेलद्वारे थेटपणे तक्रार नोंदविता येते.
रुग्णालयांमधील बिलासंदर्भात प्राप्त झालेल्या उर्वरित तक्रारींचे देखील लेखापरीक्षण करण्याची कार्यवाही सुरु असून तातडीने त्यांचे निराकरण करण्यावर भर देण्यात येत आहे, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. Mumbai | मुंबईतील 15 हजार अधिकृत स्टॉलधारक अडचणीत