एक्स्प्लोर

मुंबईत पुन्हा हिट अँड रन; आलिशान BMW नं गणेशोत्सव मंडळाचे बॅनर लावणाऱ्या दोन कार्यकर्त्यांना चिरडलं

आज देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. पण, मुंबईत पहाटे घडलल्या घटनेनं मात्र शोककळा पसरली आहे. मुंलुंडमध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशीच पहाटे हिट अँड रनची घटना घडल्यामुळे संपूर्ण मुंबई पुन्हा एकदा हादरली आहे.

Mumbai Mulund Hit And Run Case : मुंबई : हिट अँड रनच्या (Hit And Run Accident) घटनेनं पुन्हा एकदा मुंबई (Mumbai Accident) पुरती हादरुन गेली आहे. गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi) दिवशीच पहाटेच्या सुमारास मुलुंडमध्ये (Mulund) एका आलीशान कारनं दोघांना चिरडल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. दोघे तरुण गणेशोत्सव मंडळाचे बॅनर रस्त्यावर लावत होते. बॅनर लावत असतानाच दोघांना कारनं जोरदार धडक दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. 

आज देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. पण, मुंबईत पहाटे घडलल्या घटनेनं मात्र शोककळा पसरली आहे. मुंलुंडमध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशीच पहाटे हिट अँड रनची घटना घडल्यामुळे संपूर्ण मुंबई पुन्हा एकदा हादरली आहे. या घटनेत गणेशोत्सव मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. कार्यकर्त्यांना उडवल्यानंतर चालक तिथून पसार झाल्याची माहिती मिळत आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलुंडमध्ये पहाटे चार वाजता एका बीएमडबल्यू कारनं रस्त्यावर बॅनर लावणाऱ्या दोन गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना जोरदार धडक दिली आणि पसार झाला आहे. यात एक कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्याची परिस्थिती गंभीर आहे. मुलुंडचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेश मंडळाच्या मंडपाजवळ प्रीतम थोरात आणि प्रसाद पाटील हे कार्यकर्ते पहाटे चार वाजताच्या दरम्यान मुलुंडच्या गव्हाणपाडा येथील आकृती टॉवरजवळ रस्त्यावर शिडी लावून बॅनर लावत होते. अचानक भरधाव वेगात एक बीएमडब्लू कार कँपस हॉटेलकडून मुलुंड पूर्व ते वेस्टच्या ब्रिजकडे जात होती. यादोघांना शिडीसह जोरदार धडक दिली. धडक देऊन हा चालक थांबला देखील नाही, मुलुंड पश्चिमेकडे भरधाव वेगानं पळून गेला. यात प्रीतम थोरात याचा मृत्यू झाला असून प्रसाद पाटीलची प्रकृती गंभीर आहे, घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून कारचा आणि चालकाचा शोध सुरू आहे.

नेमकं काय घडलं? 

मुलुंडमध्ये पहाटे चार वाजता एका बीएमडबल्यू कारनं रस्त्यावर बॅनर लावणाऱ्या दोन गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना जोरदार धडक दिली आणि तिथून पसार झाला आहे. यात या दोन्ही कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. मुलुंडचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेश मंडळाच्या मंडपाजवळ प्रीतम थोरात आणि प्रसाद पाटील हे कार्यकर्ते पहाटे चार वाजताच्या दरम्यान, मुलुंडच्या गव्हाणपाडा येथील आकृती टॉवरजवळ बॅनर लावत होते. अचानक भरधाव वेगात एक बीएमडब्लू कार कँपस हॉटेलकडून मुलुंड ईस्ट वेस्टच्या ब्रिजकडे आली. तिने या दोघांना जोरदार धडक दिली. धडक देऊन हा चालक थांबला देखील नाही, मुलुंड पश्चिमेकडे भरधाव वेगानं पळून गेला. या भीषण अपघातात दोन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून कारचा आणि चालकाचा शोध सुरू आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prajakta Mali: प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत भावूक; कंठ दाटला, रुमाल काढला, पाणीही प्यायल्या
Prajakta Mali: प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत भावूक; कंठ दाटला, रुमाल काढला, पाणीही प्यायल्या
Video: मी माफी-बिफी मागत नसतो, प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच सुरेश धस बोलले, नेमकं काय म्हणाले
Video: मी माफी-बिफी मागत नसतो, प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच सुरेश धस बोलले, नेमकं काय म्हणाले
धक्कादायक! घरात झोपलेल्या पती-पत्नीला जीवंत जाळण्याचा प्रयत्न, घराच्या दारावर पेट्रोल ओतून लावली आग
धक्कादायक! घरात झोपलेल्या पती-पत्नीला जीवंत जाळण्याचा प्रयत्न, घराच्या दारावर पेट्रोल ओतून लावली आग
Prajakta Mali Full PC : सुरेश धस माफी मागा, प्राजक्ता संतापली,आईसमोर रडली, UNCUT PC
Prajakta Mali Full PC : सुरेश धस माफी मागा, प्राजक्ता संतापली,आईसमोर रडली, UNCUT PC
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08 pm TOP Headlines 08 pm 28 December 2024Urmila Kanetkar Car Accident : अपघातात जखमी झालेल्या उर्मिला कोठारेवर उपचार सुरु, कुटुंबाची माहितीBeed Protest On Dhananjay Munde : बीडमध्ये मोर्चा आरोपींना फाशीची शिक्षा द्या;मोर्चेकरांची घोषणाबाजीABP Majha Marathi News Headlines 07 pm TOP Headlines 07 pm 28 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prajakta Mali: प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत भावूक; कंठ दाटला, रुमाल काढला, पाणीही प्यायल्या
Prajakta Mali: प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत भावूक; कंठ दाटला, रुमाल काढला, पाणीही प्यायल्या
Video: मी माफी-बिफी मागत नसतो, प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच सुरेश धस बोलले, नेमकं काय म्हणाले
Video: मी माफी-बिफी मागत नसतो, प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच सुरेश धस बोलले, नेमकं काय म्हणाले
धक्कादायक! घरात झोपलेल्या पती-पत्नीला जीवंत जाळण्याचा प्रयत्न, घराच्या दारावर पेट्रोल ओतून लावली आग
धक्कादायक! घरात झोपलेल्या पती-पत्नीला जीवंत जाळण्याचा प्रयत्न, घराच्या दारावर पेट्रोल ओतून लावली आग
Prajakta Mali Full PC : सुरेश धस माफी मागा, प्राजक्ता संतापली,आईसमोर रडली, UNCUT PC
Prajakta Mali Full PC : सुरेश धस माफी मागा, प्राजक्ता संतापली,आईसमोर रडली, UNCUT PC
Devendra Fadnavis : अंजली दमानियांच्या ट्विटबाॅम्बनंतर बीडमध्ये हवेत फैरी करणाऱ्या छपरींवर फडणवीसांच्या कारवाईची AK-47 अखेर धडाडली; घेतला तगडा निर्णय!
अंजली दमानियांच्या ट्विटबाॅम्बनंतर बीडमध्ये हवेत फैरी करणाऱ्या छपरींवर फडणवीसांच्या कारवाईची AK-47 अखेर धडाडली; घेतला तगडा निर्णय!
माझा सुरेश धस यांना बेसिक प्रश्न आहे? मी दीड महिन्यांपासून शांत होते;  प्राजक्ता माळीने सगळंच काढलं
माझा सुरेश धस यांना बेसिक प्रश्न आहे? मी दीड महिन्यांपासून शांत होते; प्राजक्ता माळीने सगळंच काढलं
बीडमधील नेत्याच्या घरून 1992 पासून IAS अधिकारी गायब; शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक दावा
बीडमधील नेत्याच्या घरून 1992 पासून IAS अधिकारी गायब; शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक दावा
मनोज जरांगे 8 व्या नंबरवर, शेवटी संभाजीराजे; बीडच्या मोर्चात पहिलं कोण बोललं, 9 नेत्यांची जोरदार भाषणं
मनोज जरांगे 8 व्या नंबरवर, शेवटी संभाजीराजे; बीडच्या मोर्चात पहिलं कोण बोललं, 9 नेत्यांची जोरदार भाषणं
Embed widget