एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महापौर गुरुजी लवकरच महापालिका विद्यार्थ्यांना देणार धडे
मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आता चक्क मुंबईतील महापालिका शाळांमधील विद्यार्थाना इंग्रजीच्या व्याकरणाचे धडे देणार आहेत.
मुंबई : एखादी राजकीय व्यक्ती विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन शिक्षणाचे धडे देणार आहे, असं तुम्हाला सांगितलं तर? तुमचा विश्वास बसणार नाही, पण मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आता चक्क मुंबईतील महापालिका शाळांमधील विद्यार्थाना इंग्रजीच्या व्याकरणाचे धडे देणार आहेत.
शिक्षकी पेशा असलेल्या विश्वनाथ महाडेश्वर यांना विद्यार्थ्यांना शिकवायला फार आवडतं. मात्र आता ते आपली ही शिकवण्याची आवड लवकरच पूर्ण करणार आहेत. लवकरच पालिका शाळेत जाऊन इंग्रजी विषय विद्यार्थ्यांना शिकवणार असल्याची माहिती स्वतः महापौरांनी दिली.
33 वर्ष शिक्षकी प्रवास ते महापौर
अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयात एमएची पदवी संपादन केलेले विश्वनाथ महाडेश्वर हे पेशाने शिक्षक आहेत. ते राजकारणात येण्याअगोदर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय शिकवायचे. घाटकोपर पंतनगरमधल्या शिवाजी शिक्षण संस्थेच्या टेक्निकल शाळेत त्यांनी आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय शिकवला होता. त्यानंतर सांताक्रुझमधील राजे संभाजी विद्यालय या स्वतःच्या शिक्षण संस्थेत 2002 ते 2018 या काळात ते मुख्याध्यापक होते.
विद्यार्थ्यांना नेमकं काय शिकवणार?
जशी गणित विषयाची अनेकांना भीती वाटते तशीच इंग्रजी विषयाची देखील विद्यार्थ्यांना भीती वाटते. त्यातच भविष्यकाळ, भूतकाळ आणि वर्तमान काळात एखादं वाक्य बनवणे म्हणजे पोटात गोळाच येतो. मात्र हे काळ कसे वापरायचे आणि तेही कमी वेळात याचे धडे महापौर पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना देणार आहेत. त्यामुळे मुंबईचे महापौर आता गुरुजींच्या वेशात दिसणार हे मात्र नक्की!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
मुंबई
लातूर
राजकारण
Advertisement