(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Local Update: पावसाचा मध्य आणि हार्बर रेल्वेला फटका; पनवेल ते बेलापूर आणि अंबरनाथ ते बदलापूर रेल्वे वाहतूक ठप्प
पावसाचा मध्य आणि हार्बर रेल्वेला मोठा फटका बसला आहे. पनवेल ते बेलापूर दरम्यान वाहतूक ठप्प आहे. तर अंबरनाथ ते बदलापूर रेल्वे वाहतूकदेखील बंद आहे.
Mumbai Local Update: मुंबईत, ठाणे, कल्याण परिसरात मंगळवारी रात्रीपासून धो-धो पाऊस कोसळत (Maharashtra Rain Update) आहे. रात्रीपासूनच उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये रात्रभर पावसाची संततधार सुरू आहे. पहाटेपासून मुंबई आणि उपनगरामध्ये पावसाचा जोर वाढला आहे. अजूनही मुंबईत मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मात्र आता या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे. मुंबई लोकलचं वेळापत्रक कोलमडले असून पावसाचा मध्य आणि हार्बर रेल्वेला मोठा फटका बसला आहे. पनवेल ते बेलापूर दरम्यान वाहतूक ठप्प आहे. तर अंबरनाथ ते बदलापूर रेल्वे वाहतूकदेखील बंद आहे.
अर्धा तास वाहतूक विस्कळीत, मात्र मध्य रेल्वेचा जनसंपर्क विभाग अनभिज्ञ
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मागील अर्धा तासापासून वाहतूक ठप्प असून कामाला निघालेला कर्मचारी वर्ग अडकला आहे. सकाळची वेळ असल्यामुळे कार्यालयात जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांचे हाल होत असून पनवेल स्थानकात देखील गर्दी पाहायला मिळत आहे. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यानंतरही अर्धा तास मध्य रेल्वेचा जनसंपर्क विभाग मात्र अनभिज्ञ होता. अखेर अर्ध्या तासानंतर रेल्वेने लोकलची सेवा विस्कळीत झाल्याचे जाहीर केले. काही ठिकाणी लोकल प्रचंड उशिराने धावत आहे मात्र काही ठिकाणी बंद पडलेल्या आहेत.
मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत
मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ट्रेन आता उशिरानं धावत आहेत. लोकलचं वेळापत्रक विस्कळीत झाल्यानं चाकरमान्यांना कामावर जाताना समस्यांचा सामना करावा लागत आहे. काही स्थानकात रेल्वे मार्गावरील ट्रेन सध्या सुरू आहेत मात्र अत्यंत धीम्या गतीनं वाहतूक सुरू आहे.
ठाणे जिल्ह्यासाठी आॅरेंज अलर्ट जारी
कल्याण, डोंबिवली परिसरात मागील तीन तासात धुवाधार पाऊस झाला आहे. विठ्ठलवाडी परिसरात मागील तीन तासात 57 मिमी पाऊस तर कल्याण शहरात 35 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तिकडे, डोंबिवली परिसरात देखील मागील तीन तासात 49 मिमी पावसाची नोंद झाली आहे. आज दिवसभर पावसाचा जोर कायम राहणार आहे. ठाणे जिल्ह्यासाठी आॅरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हे ही वाचा: