एक्स्प्लोर

Mumbai Local Derailment at CSTM Update : घसरलेली लोकल रुळावर; लवकरच हार्बर मार्गावरील वाहतूक सुरळीत होणार

Mumbai Local Derailment at CSTM Update : विस्कळीत झालेली हार्बर मार्गावरील लोकल सेवा पुन्हा पूर्वपदावर. रुळावरुन घसरलेली लोकल कार शेडला रवाना.

Mumbai Local Derailment at CSTM Update : मुंबईत सीएसएमटी (CSMT) स्थानकात लोकलचा छोटा अपघात झाला होता. त्यामुळे हार्बर मार्गावरील (Harbour Line) सेवा विस्कळीत झाली होती. ती आता पूर्ववत करण्यात आली आहे. दुपारी 12.11 मिनिटांनी घसरलेली लोकल कारशेडच्या दिशेनं रवाना झाली आहे. सकाळी 9 वाजून 39 मिनिटांनी CSMT वरुन पनवेलला जाणारी लोकल पुढे जाण्याऐवजी मागे बफरला धडकली आहे. त्यामुळे एक डबा रुळावरुन घसरला होता. या अपघातामुळे हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली होती. हार्बर मार्गावरील अनेक गाड्याही रद्द करण्यात आल्या होत्या. 

सीएसएमटी (CSMT) स्थानकात केवळ 2 प्लॅटफॉर्म हार्बर मार्गासाठी (Harbour Line) आहेत. त्यातल्या एका प्लॅटफॉर्मवर अपघात झाल्यानं एकच प्लॅटफॉर्म वाहतुकीसाठी उपलब्ध होता. त्यामुळे हार्बर मार्गावर लोकल गाड्यांच्या खोळंबा होऊन वाहतूक विस्कळीत झाली होती. आता सर्व यंत्रणांनी तब्बल दोनच तासांत रुळावरुन घसरलेली लोकल मार्गी लावली आहे. त्यामुळे आता वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येणार आहे. 

रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी एक ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, "रुळावरुन घसरलेला कोच पुन्हा रुळावर आणण्याचं काम पूर्ण झालं आणि सीएसएमटी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 देखील वाहतुकीसाठी उपलब्ध झाला आहे."

नेमकं काय घडलं होतं? 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर सकाळी 9 वाजून 39 मिनिटांनी CSMT वरुन पनवेलला जाणारी लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर होती. तिला ग्रीन सिग्नल दिल्यानंतर लोकल पुढे जाण्याऐवजी ती लोकल मागे आली आणि बफरला धडकली. त्यामुळे लोकलचे डब्बा रुळावरुन घसरला. या घटनेत कोणलाही दुखापत झाली नाही. यामध्ये लोकलचा मागून चौथा कोच रुळावरुन घसरला होता. सर्व प्रकारच्या यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी कोच पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. अवघ्या दोन तासांत रुळावरुन घसरलेली लोकल कारशेडच्या दिशेनं रवाना झाली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफDharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यूZero Hour Full : फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड तेधर्मवीर 2 चा रिव्ह्यू;सविस्तर चर्चाZero Hour Maharashtra Politics : अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांचे कान कोण टोचणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Embed widget