Mumbai Building Collapse: कुर्ल्यातील इमारत दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू, मृतांना 5 लाखांची मदत जाहीर
Kurla Building Collapse: सोमवारी रात्री कुर्ला येथे झालेल्या इमारत दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. बचाव कार्य अद्याप सुरू आहे.
मुंबई: मुंबईतील कुर्ला येथील नाईकनगर परिसरातील चार मजली इमारत दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या ठिकाणी अद्याप मदतकार्य सुरू असून अजूनही अनेकजण या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
मुंबईतील कुर्ला येथील नाईकनगर परिसरातील चार मजली इमारत सोमवारी रात्री 11.30 च्या सुमारास कोसळली. या ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. या ठिकाणच्या ढिगाऱ्यामधून अनेकांना वाचवण्यात यश आलं आहे. जखमी लोकांवर राजावाडी रुग्णालय आणि सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Death toll in building collapse in Mumbai's Kurla area rises to ten, 13 others injured: officials
— Press Trust of India (@PTI_News) June 28, 2022
मृतांची नावं
1. अजय भोले पासपोर
2. अजिंक्य गायकवाड
3. कुशर प्रजापती
4. सिकंदर राजभर
5. अरविंद भारती
6. अनुप राजभर
7. शाम प्रजापती
8. अरविंद यादव
दोघांची अद्याप ओळख पटली नाही.
मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी यांनी मध्यरात्रीच्या सुमारास घटनास्थळी भेट दिली. जखमी झालेल्या लोकांवर जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत.
एकनाथ शिंदे गटाकडून मृतांना पाच लाख
एकीकडे राज्य सरकारकडून मृतांना मदत जाहीर करण्यात आली असून दुसरीकडे एकनाथ शिंदे गट आणि आमदार मंगेळ कुडाळकरांकडून मृतांना पाच लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. या घटनेमुळे आपल्याला दु:ख झाल्याची प्रतिक्रिया आमदार मंगेश कुडाळकर यांनी दिली आहे.
दुःखद घटना
— Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर (@mlamangesh) June 28, 2022
नाईक नगर, कुर्ला (पू) येथे चार मजली इमारत कोसळून दुर्घटना घडली. अग्निशामक , महानगरपालिका , पोलिस यंत्रणा बचाव कार्य सुरू आहे.
कुटुंबियांना 1 लाख व मृत व्यक्तींना 5 लाख मा मंत्री एकनाथ शिंदे , आमदार मंगेश कुडाळकर यांच्या तर्फे करण्यात येईल @mieknathshinde pic.twitter.com/dqLciAzmIW
या चारही इमारतींना मुंबई महानगरपालिकेकडून नोटीस देण्यात आली होती. असं असतानाही त्या ठिकाणी आठ ते दहा कुटुंबं राहत असल्याची माहिती आहे. या वास्तव्य करणारे रहिवासी भाडेकरू आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी बचाव कार्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबई महापालिकेने नोटीस बजावलेल्या इमारतींमध्ये वास्तव्य करू नये असे आवाहन करण्यात येत आहे.