(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai INDIA Meeting : मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीची जय्यत तयारी, कसा असणार कार्यक्रम?
Mumbai INDIA Meeting : मुंबईत येत्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर या दोन दिवशी इंडिया आघाडीची बैठक पार पडणार आहे. कसा असणार मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीचा कार्यक्रम?
मुंबई : भाजप आणि मोदी सरकारविरोधात विरोधकांनी एकत्रित येऊन इंडिया आघाडीची मूठ बांधली. पाटणा, बंगळुरुनंतर आता मुंबईत विरोधकांच्या इंडिया आघाडीची (Opposition Meeting) बैठक होणार आहे. मुंबईत (Mumbai) येत्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर या दोन दिवशी इंडिया आघाडीची बैठक पार पडणार आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस गट आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष समन्वयाने बैठकीच्या आयोजनाच्या तयारीसाठी लागले आहेत. मुंबईतील ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीच्या आयोजनाची मुख्य जबाबदारी, यजमान पद हे शिवसेना ठाकरे गटाकडे देण्यात आले आहे. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी येणाऱ्या नेत्यांच्या स्वागताची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून 31 ऑगस्टला डिनरचं आयोजन करण्यात आले तर 1 सप्टेंबरला काँग्रेस पक्षाकडून नेत्यांच्या लंच आयोजन करण्यात आलं आहे.
कसा असणार मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीचा कार्यक्रम?
30 ऑगस्ट - दुपारी 4 वाजता
महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व काँग्रेसचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहतील
31 ऑगस्ट - सायंकाळी सहा ते साडेसहा
देशातील इंडिया आघाडीमधील पक्षातील नेत्यांचं मुंबईतील ग्रँड हयात हॉटेल मध्ये स्वागत केले जाणार*
31 ऑगस्ट - साडे सहानंतर पुढे
इंडिया आघाडीच्या लोगोच्या अनावरण
अनौपचारिक बैठक
31 ऑगस्ट - रात्री आठ वाजता
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून देशभरातून आलेल्या इंडिया आघाडीच्या नेत्यांसाठी खास डिनर चे आयोजन
दुसऱ्या दिवसाचे कार्यक्रम
1 सप्टेंबर - सकाळी 10 वाजता
इंडिया आघाडीतील विविध पक्षांच्या प्रतिनिधींचा ग्रुप फोटोसेशन
1 सप्टेंबर - सकाळी साडे 10 ते दुपारी 2 वाजता
इंडिया आघाडीतील सर्व पक्षातील प्रतिनिधींची महत्त्वाची बैठक पार पडणार*
1 सप्टेंबर - दुपारी 2 वाजता
महाराष्ट्र काँग्रेसकडून इंडिया आघाडीतील नेत्यांसाठी खास दुपारच्या जेवणाचे आयोजन
1 सप्टेंबर - दुपारी साडेतीन वाजता
इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद
लोगोचं लॉन्चिंग, जाहीरनाम्यावर चर्चा... बैठकीची जय्यत तयारी
इंडिया बैठकीसाठी महाविकास आघाडीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या बैठकीत सर्व पक्षांचे समन्वय करण्याबाबत समिती नेमण्यात येणार आहे. ही समिती अकरा जणांची असेल. कोणत्या विषयावर इंडिया आघाडी भूमिका मांडणार यावर चर्चा होणार आहे. सोबतच इंडिया लोगोचं लॉन्चिंग होणार आहे. इंडिया आघाडीचा जाहीरनामा कसा असेल या संदर्भात चर्चा होईल. महाराष्ट्रातील अणि इतर राज्यातील स्थानिक प्रश्न कोणते जाहीरनाम्यात घ्यायचे यावर चर्चा केली जाईल.
बैठकीसाठी हयात हॉटेलमधील 175 खोल्या नेत्यांसाठी बुक केल्या आहेत. विविध राज्यातून 60 ते 65 नेते बैठकीला राहणार उपस्थित राहणार आहेत. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी येणाऱ्या नेत्यांचं महाराष्ट्रीयन पद्धतीने स्वागत केलं जाईल. तुतारी, नाशिक ढोलने नेत्यांचे स्वागत होणार आहे. 31 ऑगस्ट रोजी होणाऱ्या डिनरमध्ये महाराष्ट्रीयन पदार्थांची रेलचेल असेल. पुरणपोळी, झुणका भाकर ते वडा पाव असे मराठी पदार्थ देशभरातील नेत्यांसाठी मेन्यूमध्ये असतील.
हेही वाचा