एक्स्प्लोर

हिमांशू रॉय यांची सुसाईड नोट सापडली!

हिमांशू रॉय यांची आत्महत्या : मुंबईतील राहत्या घरी दुपारी पावणेदोनच्या सुमारास त्यांनी तोंडात गोळी झाडून आयुष्याची अखेर केली. त्यांच्या मृतदेहाशेजारी सुसाईड नोट मिळाली आहे.

हिमांशू रॉय यांची आत्महत्या : मुंबई : राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आणि माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांनी आज (11 मे) आत्महत्या केली. मुंबईतील राहत्या घरी दुपारी पावणेदोनच्या सुमारास त्यांनी तोंडात गोळी झाडून आयुष्याची अखेर केली. त्यांच्या मृतदेहाशेजारी सुसाईड नोट मिळाली आहे. आजारपणातून आलेल्या नैराश्येतून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये केला आहे. मुंबई पोलिसांनी परिपत्रक काढून ही माहिती दिली आहे. हिमांशू रॉय यांचा पार्थिव पोस्टमॉर्टेमसाठी जीटी रुग्णालयात पाठवला असून आज रात्री 10 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हिमांशू रॉय यांची सुसाईड नोट सापडली! आत्महत्येचं नेमकं कारण काय? हॉर्स रायडिंग करताना ते पडले, त्यात त्यांच्या पायाला दुखापत झाली. दुखापत बरी होत नसल्याने त्यांनी अधिक तपासण्या केल्या. त्यावेळी डॉक्टरांना संशय आला. त्यांनी कॅन्सरसंबंधित तपासणी केली असता, त्यांना बोन मॅरो कॅन्सर असल्याचं उघड झालं. मुंबई तसंच परदेशात त्यांनी कॅन्सरचे उपचार केले. त्यांच्या अखेरचे उपचार पुण्यात सुरु होते. उपचारानंतर फिट झाल्याचं वाटल्याने त्यांनी पुन्हा जीम जॉईन केली. परंतु कॅन्सरने पुन्हा डोकं वर काढलं. त्यामुळे त्यांना नैराश्येने ग्रासलं. त्यामुळे आजारपणाला कंटाळून त्यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. आयपीएस हिमांशू रॉय यांची आत्महत्या कॅन्सरवर मात, नैराश्याने हरवलं पिळदार शरीरयष्टी असलेल्या हिमांशू रॉय यांची प्रकृती कॅन्सरमुळे खालावली होती. अशा परिस्थितीती आपल्याला कोणी पाहू नये, असं त्यांना वाटत होतं. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली होती. कॅन्सरवर मात करुन पुन्हा वर्दीमध्ये ड्यूटी जॉईन करण्याची त्यांची इच्छा होती. परंतु याचदरम्यान, त्यांना नैराश्येने ग्रासलं. त्याच डिप्रेशनमधून त्यांनी आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. अनेक जण हिमांशू रॉय यांच्याकडे फिटनेस टिप्स घेत असत. साखर खाणं बंद, तसंच गोड पदार्थ, गोडाचा चहा, साखर असलेली पेयं बंद केली, हे आपल्या फिटनेसचं रहस्य असल्याचं ते सगळ्यांना सांगत. हिमांशू रॉय घोड्यावरुन पडले तेव्हाच घात झाला! रॉय यांनी कोणालाही दुखावलं नाही : उज्ज्वल निकम हिमांशू रॉय हा जिंदादिल माणूस होता. मोठ्या पदावर असून त्यांच्या वागण्याबोलण्यात कोणताही बडेजावपणा नव्हता. शिपायापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांना ते अदबीने वागवायचे. कोणालाही ताटकळत ठेवत नसत. इतकंच नाही तर त्यांनी कधीही कोणाला दुखावलं नाही. त्यांना जिमची आवड होती. परंतु दुर्धर आजाराने त्यांना ग्रासलं. आजारामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे नैराश्य आल्याने त्यांनी आयुष्य संपवलं असावं, असं उज्ज्वल निकम यांनी सांगितलं. कोण होते हिमांशू रॉय? हिमांशू रॉय हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. चार वर्ष मुंबई क्राईम ब्रान्चमध्ये काम केलं होतं. तर एटीएएस प्रमुख म्हणून ते अधिक चर्चेत आले. हिमांशू रॉय यांनी अनेक हायप्रोफाईल प्रकरणं हाताळली. यात जे डे हत्याप्रकरण, आयपीएल सट्टेबाजी प्रकरणांचा समावेश होता. मात्र दोन वर्षांपूर्वी त्यांना दुर्धर आजाराने ग्रासलं. त्यामुळे ते मेडिकल लीव्हवर होते. आजारपणामुळेच त्यांनी आयुष्य संपवलं असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु शवविच्छेदन अहवालातूनच खरं कारण समोर येईल. हिमांशू रॉय यांनी 2013 मधील आयपीएलच्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अनेक अटकसत्र केलं होतं. त्यांनीच विंदू दारासिंहला बेड्या ठोकल्या होत्या. याशिवाय अजमल कसाबच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणीही हिमांशू रॉय यांच्याच नेतृत्त्वात झाली होती. जेव्हा रॉय यांनी कसाबला गुपचूप पुण्याला नेलं होतं!

महत्त्वाच्या बातम्या

मंदिर सोडून देवच दर्शन देण्यासाठी आले, असा मुख्यमंत्री पुन्हा कधी भेटणे नाही, भाजप आमदाराचं जोरदार भाषण
मंदिर सोडून देवच दर्शन देण्यासाठी आले, असा मुख्यमंत्री पुन्हा कधी भेटणे नाही, भाजप आमदाराचं जोरदार भाषण
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
मोठी बातमी : 4 कोटींची लँड क्रुझर, 32 इनोव्हा, 2 फॉर्च्युनर, राज्य सरकारकडून नव्या कोऱ्या 44 गाड्यांच्या खरेदीचा निर्णय!
मोठी बातमी : 4 कोटींची लँड क्रुझर, 32 इनोव्हा, 2 फॉर्च्युनर, राज्य सरकारकडून नव्या कोऱ्या 44 गाड्यांच्या खरेदीचा निर्णय!
Contractors: शासनानं तब्बल 96 हजार कोटी थकवले; दहा महिन्यात नऊ कंत्राटदारांनी आयुष्य संपवलं; आता राज्य कंत्राटदार महासंघाचा एल्गार, राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडकणार
शासनानं तब्बल 96 हजार कोटी थकवले; दहा महिन्यात नऊ कंत्राटदारांनी आयुष्य संपवलं; आता राज्य कंत्राटदार महासंघाचा एल्गार, राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडकणार

व्हिडीओ

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Embed widget