एक्स्प्लोर

लोकल अपघातात जीव गमावलेल्या तरूणाच्या आई-वडिलांना नुकसानभरपाई द्या, हायकोर्टाचे आदेश; 15 वर्षांनी पीडित कुटुंबीयांना न्याय

Mumbai Local : प्रवास करताना अपघात झालेल्या तरुणाच्या दोन्ही पालकांना प्रत्येकी 4 लाख रूपये नुकसानभरपाई देण्याचे हायकोर्टाने मध्य रेल्वेला आदेश दिले आहेत. 

Mumbai Local : मुंबई लोकलमधून प्रवास करत असताना लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना 8 लाख रूपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला दिलेत. या तरुणाच्या आई व वडिलांना प्रत्येकी चार लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी असं मुंबई उच्च न्यायालयानं आपल्या आदेशांत स्पष्ट केलंय. 

काय आहे प्रकरण?

8 मे 2010 रोजी वडाळाहून चिंचपोकळीला जात असताना लोकलमधील गर्दीनं नासीर खान या तरूणाचा बळी घेतला. प्रवासी एकमेकांना ढकलत असताना नासीर अचानक लोकलमधून पडून बेशुद्ध झाला होता. उपचारादरम्यान त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या आई-वडिलांनी नुकसानभरपाईसाठी रेल्वेकडे दावा दाखल केला होता. मात्र रेल्वे दावा प्राधिकरणानं हा दावा फेटाळून लावला. त्याविरोधात नासीरच्या आई-वडिलांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

न्यायमूर्ती फिरदोश पुन्नीवाला यांच्या एकलपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. सुनावणीनंतर हायकोर्टानं रेल्वे प्राधिकरणाचा नुकसानभरपाई न देण्याचा निकाल रद्द केला. तसेच आठ आठवड्यात प्रशासनानं त्यांच्या बॅंक खात्यात प्रत्येकी चार लाख रुपये जमा करावेत, असे आदेश हायकोर्टानं जारी केलेत. 

हायकोर्टाचा निकाल काय? 

नासीर लोकलमधून पडला याची माहिती पोलिसांनी स्टेशन मास्टरला दिली नाही. त्यामुळे नासीरचा मृत्यू लोकलमधून पडल्यानंच झालाय हे सिद्ध झालेलं नाही, असा निष्कर्ष प्राधिकरणाने नोंदवला होता. मात्र हा निष्कर्ष हायकोर्टानं चुकीचा ठरवला. नासीर लोकलमधून पडल्यानंतर त्याला जे. जे. रुग्णालयात नेण्यात आलं होतं, त्याच्या नोंदीही आहेत. यावरुन स्पष्ट होते की नासीरचा मृत्यू हा लोकलमधून पडल्यानंच झालाय. तसेच लोकलमधून पडल्यानंतर नासीरजवळ कोणतीच वस्तू सापडली नाही. त्याच्याकडे रेल्वेचं तिकिटही नव्हतं, असा दावा प्रशासनानं केला होता. मात्र त्याच्याकडे लोकलचा मासिक पास होता, असं त्याच्या वडिलांनी सांगितलं. 

ही बातमी वाचा: 

                                                                                                                      

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shaktipeeth Expressway : शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यसाठी कोणता निर्णय झाला?
शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यसाठी कोणता निर्णय झाला?
गृहमंत्रीपद सांभाळण्यात फडणवीस अपयशी; सैफवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचा संताप, मुंबईच्या खासदारही चिडल्या
गृहमंत्रीपद सांभाळण्यात फडणवीस अपयशी; सैफवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचा संताप, मुंबईच्या खासदारही चिडल्या
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
Nashik News : ड्युटी संपली! घरी जायला निघाली पण...; नाशिकमध्ये नायलॉन मांजाने महिला कॉन्स्टेबलचा कापला गळा
ड्युटी संपली! घरी जायला निघाली पण...; नाशिकमध्ये नायलॉन मांजाने महिला कॉन्स्टेबलचा कापला गळा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Doctors On Saif ali Khan : सैफ अली खानला ऑपरेशन शिएटरमधून आयसीयूमध्ये हलवलंDhananjay Munde Vaijnath Mandir : धनंजय मुंडे परळी वैजनाथ मंदिरात, वैजनाथाची विधीवत पूजाBajrang Sonawane Full PC : 'ही' उत्तरं पंकजा मुंडेंकडून अपेक्षित नाही, बीड प्रकरणावरुन हल्लाबोल!Saif Ali Khan Attacked : सैफवरील हल्ल्यानंतरचा पहिला मोठा व्हिडीओ, पाहा EXCLUSIVE CLIP

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shaktipeeth Expressway : शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यसाठी कोणता निर्णय झाला?
शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यसाठी कोणता निर्णय झाला?
गृहमंत्रीपद सांभाळण्यात फडणवीस अपयशी; सैफवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचा संताप, मुंबईच्या खासदारही चिडल्या
गृहमंत्रीपद सांभाळण्यात फडणवीस अपयशी; सैफवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचा संताप, मुंबईच्या खासदारही चिडल्या
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
Nashik News : ड्युटी संपली! घरी जायला निघाली पण...; नाशिकमध्ये नायलॉन मांजाने महिला कॉन्स्टेबलचा कापला गळा
ड्युटी संपली! घरी जायला निघाली पण...; नाशिकमध्ये नायलॉन मांजाने महिला कॉन्स्टेबलचा कापला गळा
Saif ali khan attack in Mumbai: लिमाच्या तक्रारीवरुन हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल; सैफच्या घरी मध्यरात्री काय घडलं, पोलिसांनी दिली माहिती
लिमाच्या तक्रारीवरुन हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल; सैफच्या घरी मध्यरात्री काय घडलं, पोलिसांनी दिली माहिती
Beed News: वैजनाथाचं दर्शन घेऊन धनुभाऊ थेट जगन्मित्र कार्यालयात; वाल्मिक कराडच्या समर्थकांची गर्दी
Beed News: वैजनाथाचं दर्शन घेऊन धनंजय मुंडे परळीतील जगन्मित्र कार्यालयात पोहोचले
मोठी बातमी! मुंबई, पुण्यासह राज्यभरात 'धुरळा' उडणार; महापालिका, ZP निवडणुका एप्रिलमध्ये होणार?
मोठी बातमी! मुंबई, पुण्यासह राज्यभरात 'धुरळा' उडणार; महापालिका, ZP निवडणुका एप्रिलमध्ये होणार?
Stock Market : सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेल्या कंपनीला 960 कोटींची ऑर्डर, अपडेट येताच शेअर बनला रॉकेट
960 कोटींची ऑर्डर मिळताच शेअर बनला रॉकेट, सचिन तेंडुलकरनं देखील केलीय गुंतवणूक
Embed widget