एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई हायकोर्टाचे नवनियुक्त न्यायमूर्ती संदीप शिंदेंना दिलासा
संदीप शिंदे यांची न्यायमूर्तीपदी नियुक्ती नेमकी कोणत्या आधारे करण्यात आली आहे, असा सवाल याचिकेतून विचारण्यात आला होता.
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे नवनियुक्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नियुक्तीला आव्हान देणारी याचिका हायकोर्टानं फेटाळून लावली आहे. विशेष म्हणजे याचिकाकर्त्यांना एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
कोणतेही सबळ पुरावे नसताना हायकोर्टातील न्यायाधीशांविरोधात आरोप करत याचिका दाखल केल्याने हायकोर्टानं ही याचिका फेटाळून लावली. अॅड. उल्हास नाईक यांनी ही याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे आणि न्यायमूर्ती राजेश केतकर यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली.
न्यायमूर्ती संदीप शिंदे हे याआधी जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश असताना त्यांना सक्तीची निवृत्ती देण्यात आली होती. तसेच मुख्य सरकारी वकील असताना संशयास्पद कारभार आणि गैरवर्तन या कारणांकरता याआधी दोनवेळा त्यांची अतिरीक्त न्यायमूर्ती पदासाठीची नियुक्ती नाकारण्यात आली होती, असा आरोप या याचिकेत करण्यात आला होता. त्यामुळे आता ही नियुक्ती नेमकी कोणत्या आधारे करण्यात आली आहे, असा सवाल या याचिकेतून विचारण्यात आला होता.
या संदर्भात राज्य सरकारच्या गुप्तचर विभागाला तसंच विधी आणि न्याय विभागाला उत्तर देण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी प्रमुख मागणी या याचिकेत करण्यात आली होती.
तीन महिन्यांपूर्वीच संदीप शिंदे यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी अनेक महत्त्वाच्या खटल्यांत त्यांनी हायकोर्टातील मुख्य सरकारी वकील म्हणून कामकाज पाहिलं आहे. त्यात सलमान खान हिट अँड रन खटल्याचाही समावेश होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement