एक्स्प्लोर

पुण्यात शेजारणीकडे घराची चावी ठेवणं महागात; बनावट चावीद्वारे लाखो रुपयांवर डल्ला

पुण्यात बाहेरगावी जाताना शेजारणीकडे चावी ठेवणे एका कुटुंबाला महागात पडलंय. कारण, या शेजारणीने तिच्या मैत्रिणीच्या मदतीने बनावट चावीद्वारे वेळोवेळी लाखो रुपयांचा ऐवज या घरातून लुटलाय.

पुणे : बाहेर जाताना शेजाऱ्यांकडे घराची चावी ठेवणे एका कुटुंबाला चांगलच महागात पडलंय. शेजारणीने त्याच चावीच्या सहाय्याने बनावट चावी तयार करून एका मैत्रिणीच्या मदतीने वेळोवेळी घरात चोरी केल्याची घटना उघडकीस आलीय. या महिलेला तिच्या साथीदारासह वानवडी पोलिसांनी अटक केली. भारती भगवान असवानी(वय 60)आणि सुवर्णमला बूथवेल खंडागळे(वय 59)अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. सपना जिग्नेश शहा(38)यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. आरोपी आणि फिर्यादी या एकाच सोसायटीत जवळजवळ राहतात. फिर्यादी जेव्हा बाहेर जायच्या तेव्हा त्या भारती असवानी यांच्याकडे घराची चावी ठेवून जायच्या. दरम्यान भारती असवानी यांनी बनावट चावी तयार केली आणि जेव्हा शहा कुटुंबीय बाहेर गावी जायचे तेव्हा दोन्ही आरोपी महिला बनावट चावीने कुलूप उघडून घरात प्रवेश करून चोरी करत असत. हा प्रकार जून 2018 ते फेब्रुवारी 2020 या काळात सातत्याने घडत होता. या कालावधीत फिर्यादी यांच्या घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा सात लाख 42 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरी गेला होता. चोरी केल्यानंतर प्रेयसीला पाठवायचा सेल्फी; अजब प्रेमवीराला फिल्मी स्टाईलने अटक कुलूप न उघडताही चोरी होत असल्याने कुटुंबीय हैराण - घराचे कुलूप न उघडताही चोरी होत असल्याने शहा कुटुंबीय हैराण होते. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी त्यांनी बेडरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावला आणि त्याचा अक्सेस मोबाईलवर घेतला. त्यानंतर शेजारिच राहणाऱ्या भारती असवानी यांना मुंबईला जात असून घराकडे लक्ष ठेवण्यास सांगितले. परंतु, मुंबईला न जाता ते जवळच असणाऱ्या फ्लॅट राहण्यास गेले. इकडे ते जाताच आरोपी महिलांनी बनावट चावीने कुलूप उघडून घरात प्रवेश केला आणि बेडरुममधील कपाट उघडून शोधाशोध सुरू केली. हे सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आणि फिर्यादीच्या मोबाईलमध्ये दिसून आले. त्यानंतर फिर्यादी यांनी तत्काळ घरी धाव घेत आपल्या शेजाऱ्यांना घरात चोरी करताना रंगेहाथ पकडले आणि याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत दोघी आरोपींना अटक केली. Pimpri Robbery | पिंपरी-चिंचवडमध्ये दुकानात चोरी, शटर तोडून चोरांचा दानपेटीवर डल्ला, तीन सेकंदात उघडलं शटर

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pune Teachers Constituency Election : दोन ओएसडीच्या स्पर्धेत सचिन सानपांनी बाजी मारली आता शिंदेंनी सुद्धा पाठिंबा दिला, पुणे शिक्षकच्या लढाईतील कोण आहेत सचिन सानप?
दोन ओएसडीच्या स्पर्धेत सचिन सानपांनी बाजी मारली आता शिंदेंनी सुद्धा पाठिंबा दिला, पुणे शिक्षकच्या लढाईतील कोण आहेत सचिन सानप?
Pune Crime: तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
Nana Patekars Son Malhar On Actors Final Moments: 'नाना पाटेकरांचं माधुरी दीक्षितसोबत शूट ठरलेलं, पण...'; 'त्या' रात्री गोव्यात नेमकं काय घडलं? मल्हार पाटेकरनं स्पष्टच सांगितलं
'नाना पाटेकरांचं माधुरी दीक्षितसोबत शूट ठरलेलं, पण...'; 'त्या' रात्री गोव्यात नेमकं काय घडलं? मल्हार पाटेकरनं स्पष्टच सांगितलं
Anil Bonde : आम्ही बेशिस्त खपवून घेणार नाही, भाजप प्रमाणे शिवसेनेनेही कारवाई करावी; महायुतीतील बंडखोरीवरून अनिल बोंडेंचा संताप, तर बहिणीविषयी म्हणाले, ती बंडखोर वृत्तीचीच...
आम्ही बेशिस्त खपवून घेणार नाही, भाजप प्रमाणे शिवसेनेनेही कारवाई करावी; महायुतीतील बंडखोरीवरून अनिल बोंडेंचा संताप, तर बहिणीविषयी म्हणाले, ती बंडखोर वृत्तीचीच...

व्हिडीओ

Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajnath Singh: ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
Malegaon Dongrale Case Verdict: मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
Sachin Sanap: शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
Pune Crime: तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
Baramati News: विद्या प्रतिष्ठानचा वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
विद्या प्रतिष्ठानचा वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
Abhijeet Dipke: दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Embed widget