Goregaon Fire: गोरेगावात भीषण अग्नितांडव, आठ जणांचा मृत्यू, 58 जखमी, मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत
Goregaon Fire : अग्निशमन दल आणि पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत

मुंबई : मुंबईच्या गोरेगावमधील (Mumbai Goregaon Fire News) जय भवानी इमारतीच्या पार्किंगमध्ये मध्यरात्री तीनच्या आसपास भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झालाय. 58 जण जखमी झालेत त्यातल्या पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. अग्निशमन दल आणि पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले आहेत. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी या आगीत मृत्यू झालेल्यांच्या वारसांना मदत जाहीर केली आहे.
मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून झालीये. तर जखमींच्या उपचारांचा खर्चही राज्य सरकार करणार आहे तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पोलिस अधिकारी आणि महापालिका आयुक्तांशी चर्चा सुरू आहे. स्क्रॅपमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांच्या परिवाराला शासनाकडून पाच लाखांची मदत करण्यात येणार आहे. जखमींचा उपचाराचा खर्च शासनाकडून केला जाणार आहे .
गोरेगावच्या उन्नत नगर येथील एसआरएच्या जय भवानी इमारतीला भीषण आग लागून झालेल्या दुर्घटनेत काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात काही लहान मुलांचाही समावेश आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून त्यात जीव गमवावा लागलेल्या नागरिकांप्रती मी माझी सहवेदना व्यक्त करतो.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 6, 2023
या आगीच्या…
पालिका आयुक्त इकबाल चहल ट्रामा केअर रुग्णालयात
जखमी झालेल्यांवर सध्या कूपर आणि ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.या भीषण आगीत 30 पेक्षा अधिक दुचाकी आणि चार कार जळून खाक झाल्यात. तसेच तळमजल्यावरील काही दुकानंही जळून खाक झालेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं असून, सध्या कुलिंगचं काम सुरु आहे. पालिका आयुक्त इकबाल चहल ट्रामा केअर रुग्णालयात दाखल झाले आहे. तर दीपक केसरकर म्हणाले, दिल्लीहून मुख्यमंत्र्यांच दिल्लीहून फोन आला आणि त्यांनी मला तात्काळ गोरेगावला जायला सांगितलं आहे.
कापडाच्या आणि भंगारच्या गोदामाला आग
तर पालकमंत्री मंगलप्रसाद लोढा म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या संपर्कात मी आहे. गोरेगाव येथे घडलेली दुर्घटना दुर्दैवी आहे. आग इमारतीच्या खाली कापडाच्या आणि भंगारच्या गोदामामध्ये लागली.
हे ही वाचा :
अग्नीतांडव! मुंबईच्या गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग, सात जणांचा होरपळून मृत्यू तर 58 जखमी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
