मरिन लाईन्स परिसरातील फॉर्च्युन हॉटेलला आग; 30 डॉक्टर थोडक्यात बचावले
मुंबईतील मरीन लाइन्स येथील धोबी तलाव परिसरातील फॉर्च्युन हॉटेलमध्ये आग लागली असून या हॉलेमध्ये जे.जे. हॉस्पिटलचे 28 ते 30 डॉक्टर राहत होते. सर्व डॉक्टरांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.
मुंबई : मुंबईतील मरीन लाइन्स परिसरातील एका हॉटेलला आग लागली आहे. हॉटेलच्या दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग लागली होती. हॉटेलमध्ये वास्तव्याला असणाऱ्या 30 डॉक्टर्सना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं आहे. हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेले सर्व डॉक्टर्स जेजे रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांचा उपचार करत होते. या सर्व डॉक्टरांना मरीन लाइन्स येथील धोबी तलाव परिसरातील फॉर्च्युन हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. दरम्यान, आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. सर्व डॉक्टरांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं असून त्यांना तत्काळ ट्रायडेंट हॉटेलमध्ये रवाना करण्यात आलं आहे.
सदर प्रकाराची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 ते 12 गाड्या तत्काळ घटनास्थळी पाचारण करण्यात आल्या. या हॉटेलमध्ये जे.जे. हॉस्पिटलचे 28 ते 30 डॉक्टर राहत होते. सर्व डॉक्टरांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असून अग्निशमन दलाच्या वतीने फायर कूलिंगचं काम सुरु आहे.
मुंबईतील मरिन लाइन्स परिसरात असणाऱ्या फॉर्च्युन हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर रात्री उशिरा आग लागली. थोड्या वेळाने ही आग हॉटेलच्या चौथ्या मजल्यापर्यंत पसरली. त्यानंतर हॉटेलमध्ये एकच धावपळ सुरु झाली. धुराचे प्रचंड लोळ बाहेर पडल होते. धुरामुळे लोकांना काहीच दिसत नव्हतं. हॉटेलमध्ये डॉक्टरांसोबतच काही क्वॉरंटाइन करण्यात आलेले लोकही होते. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं सांगितलं जात आहे.
संबंधित बातम्या :
राज्य सरकार प्रत्येकवेळी एक आभासी आकडा फेकतात; देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप
मीरा रोड पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी कोरोनामुक्त
श्रमिक ट्रेनमध्ये प्रवेश मिळेल या आशेवर घरदार सोडून आलेल्या स्थलांतरीत मजुरांची दुरावस्था