एक्स्प्लोर

Mumbai Cruise Drugs Case: क्रुझ ड्रग्ज प्रकरणी आतापर्यंत 16 जणांना अटक, समीर वानखेडे म्हणाले...

Mumbai Cruise Drugs Case: एनसीबीने अलीकडेच मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर ड्रग्ज पार्टी केल्याप्रकरणी आतापर्यंत एकूण 16 जणांना अटक केली आहे. काल या प्रकरणात आणखी 4 जणांना अटक करण्यात आली आहे.

Mumbai Cruise Drugs Case: एनसीबीने अलीकडेच मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर ड्रग्ज पार्टी केल्याप्रकरणी आतापर्यंत एकूण 16 जणांना अटक केली आहे. काल या प्रकरणात आणखी 4 जणांना अटक करण्यात आली असून त्यांना आज न्यायालयात दाखल केले जाणार आहे, अशी माहिती एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी दिली आहे. 

समीर वानखेडे म्हणाले की,  आम्ही आणखी चार जणांना अटक केली आहे, जे ऑर्गनयझर आहेत. त्यांना आज कोर्टात दाखल केले जाईल.  जे आम्हाला सांगायचे आहे ते कोर्टात सांगितले आहे. ते आम्ही शेअर करू शकत नाही.  या प्रकरणात आता पर्यंत 16 जणांना अटक केली आहे. आमच्याकडे आणखी तपासासाठी वेळ आहे, चांगला तपास केला जाईल, असं ते म्हणाले.

Mumbai Cruise Drugs Case: एनसीबीच्या कारवाईनंतर आता मुंबई पोलीस सक्रिय; क्रूझ पार्टी प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची शक्यता

क्रीप्टो करन्सीबाबत बोलताना ते म्हणाले की, त्यात तपासाचा लीड आहेत त्या शेयर करू शकणार नाही, जे काही  काही विदेशी ड्रग्स जप्त करण्यात आले आहे, त्याचा प्रॉपरली तपास सुरू आहे. आणखी काही रेड बाबत सांगू शकत नाही, असं समीर वानखेडे म्हणाले. 

मुंबई पोलिसांकडून परवानगी घेण्यात आली नाही
शाहरुखचा मुलगा आर्यन खान ज्या ड्रग्ज पार्टीमुळे कोठडीत आहे, त्यात आता मुंबई पोलिसांची एन्ट्री झाली आहे. कॉर्डिलिया क्रूझवरील पार्टीप्रकरणी आता मुंबई पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. विशेष म्हणजे, या पार्टीसाठी मुंबई पोलिसांकडून परवानगी घेण्यात आली नसल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे पाच पेक्षा जास्त लोक याठिकाणी जमलेच कसे, याचा तपासही आता मुंबई पोलिसांकडून केला जात आहे. त्यामुळे मुंबई पोलिसही याप्रकरणात कलम 188 अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची शक्यता आहे. दरम्यान, सध्या मुंबई पोलिसांनी विविध यंत्रणांकडून माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एनसीबी विरुद्ध मुंबई पोलीस असा संघर्ष पाहायला मिळत आहे. 

मुंबई पोलीस गुन्हा दाखल करण्याची शक्यता
या प्रकरणात जर नियम मोडल्याची बाब समोर आली तर मुंबई पोलीस त्यामध्ये कलम 188 अन्वये गुन्हा नोंदवू शकतात. मुंबई पोलिसांनी क्रूझ प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या घटनेशी संबंधित माहिती गोळा करण्यासाठी मुंबई पोलीस क्रूझ टर्मिनलचे सीसीटीव्ही फुटेज तपासतील. पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे की ज्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्या घटनेशी संबंधित माहिती आली (Instagram) त्याचीही चौकशी केली जाईल.

आर्यनसह 8 लोकांना 7 ऑक्टोबरपर्यंत कोठडी
मुंबई पोलिसांनी शनिवारी रात्री क्रूझवर ड्रग्ज पार्टी केल्यामुळे शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह 8 जणांना ताब्यात घेतले होते. नंतर त्यांना अटक करण्यात आली. सध्या, आर्यनसह सर्व आठ जणांना 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडीत पाठवण्यात आले आहे. एनसीबी या प्रकरणाची चौकशी करत आहे.

क्रुझवर कसं पोहोचलं ड्रग्ज?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, या प्रकरणात सहभागी असलेल्या लोकांनी आपल्या पॅंट, अंडरवेअर, कॉलरच्या सिलाईमध्ये तसंच महिलांनी आपल्या पर्सच्या हॅंडलमध्ये लपवून आणलं होतं.   

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच बोलले; तोंडभरून कौतुक करत म्हणाले...
तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच बोलले; तोंडभरून कौतुक करत म्हणाले...
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Narendra Dabholkar and Sachin Andure: मोठी बातमी: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती
मोठी बातमी: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Embed widget