Mumbai Crime: अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा गळा आवळला, मुलाने पाहिलं म्हणून त्यालाही संपवलं, मुंबईत धक्कादायक घटना
कांदिवली येथे पत्नीसह चार वर्षाच्या मुलाची गळा आवळून हत्या करून आत्महत्येचा बनाव करणाऱ्या आरोपी पतीला अखेर समता नगर पोलिसांनी अटक केली आहे.
Mumbai Crime: राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीने कळस गाठल्याची उदाहरणं समोर येत आहेत .मुंबईतील कांदिवली येथे अनैतिक संबंधांच्या संशयातून घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण राज्य हादरले आहे .पत्नीची गळा आवळून हत्या करत आत्महत्या असल्याचं भासवलं .चार वर्षाच्या मुलानं पाहिलं म्हणून त्याचीही हत्या करून आरोपीने पळ काढला होता .पत्नीसह अल्पवयीन मुलाची हत्या करणाऱ्या पतीला समता नगर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे .शिवशंकर केंद्र दत्ता असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून दुहेरी हत्याच्या याच गुन्ह्यात त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे .(Murder Case)
नक्की घडले काय?
अनैतिक संबंधाच्या संशयावरून त्याने अगोदर पत्नीची गळा आवळून हत्या करून तिने आत्महत्या केल्याचे चित्र निर्माण केले . ही हत्या करताना मुलाने पाहिले म्हणून चार वर्षे मुलाची देखील हत्या करून आरोपीने पळ काढला होता.कांदिवली येथे पत्नीसह चार वर्षाच्या मुलाची गळा आवळून हत्या करून आत्महत्येचा बनाव करणाऱ्या आरोपी पतीला अखेर समता नगर पोलिसांनी अटक केली आहे. पत्नीसह अल्पवयीन मुलाची हत्या करून आत्महत्येचा बनाव करणाऱ्या पतीचे नाव शिवशंकर केंद्र दत्ता असे आहे. दुहेरी हत्येच्या याच गुन्ह्यात त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे .या घटनेने मोठी खळबळ उडाली असून मुंबई हादरली आहे.
वडिलांवर रागावून मुलीने घर सोडलं,रिक्षाचालकाने अर्नाळ्यात नेऊन तरूणीवर केले अत्याचार
मुंबईतील एक भयंकर घटना (Mumbai Crime News) घडली आहे. एका रिक्षाचालकाने (21 जानेवारी 2025 रोजी) 20 वर्षीय तरुणीवर पाशवी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने संपूर्ण राज्य हादरले आहे. तरुणीवर बलात्कार करून तिच्यावर सिझेरियन ब्लेड आणि दगडांसह हल्ला करून तिला जखमी अवस्थेत सोडून दिलं. या पिडित तरूणीच्या गुप्तांगात काही दगडाचे तुकडेही घालण्यात आले होते(Mumbai crime News). गोरेगाव पूर्वेत वनराई पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली होती. याप्रकरणी वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी रिक्षा चालकाला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास वनराई पोलीस करत आहे. राम मंदीर परिसरात घडली आहे. याप्रकरणी रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केलं आहे. आरोपीने अत्याचार केल्याचंही कबूल केलं आहे. सदर घटनेनं मात्र मुंबई हादरली आहे.
हेही वाचा: