एक्स्प्लोर

Mumbai Crime : मुंबईत 23 वर्षीय एअर होस्टेस राहत्या घरी गळा चिरलेल्या अवस्थेत आढळली, इमारतीत सफाईचं काम करणारा इसम अटकेत

मुंबई : मुंबईतील पवई परिसरात 23 वर्षीय एअर होस्टेसची हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी इमारतीत साफसफाईचं काम करणाऱ्या इसमाला ताब्यात घेतलं आहे.

मुंबई : मुंबईतील पवई (Powai) परिसरात 23 वर्षीय एअर होस्टेसची (Air Hostess) हत्या (Murder) झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पवई पोलीस स्टेशनच्या हद्दीतील  एन जी को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या इमारतीमध्ये संबंधित एअर होस्टेसचा मृतदेह आढळून आला. पवई पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी इमारतीत साफसफाईचं काम करणाऱ्या इसमाला ताब्यात घेतलं आहे.

हवाई सुंदरीची गळा चिरुन हत्या

मरोळ मारहाव रोडवर असलेल्या एन जी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये मृत एअर होस्टेस राहत होती. रुपल ओग्रे असं तिचं नाव होतं. ती मूळची छत्तीसगडची असून एप्रिलमध्ये एअर इंडियामध्ये (Air India) प्रशिक्षणासाठी मुंबईत आली होती. राहत्या घरी मध्यरात्री तिचा मृतदेह सापडला. गळा चिरुन तिची हत्या करण्यात आली होती. याची माहिती मिळताच पवई पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला. पवई पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 302 अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपीच्या शोधासाठी चार पथकं तयार करण्यात आली. 

इमारतीमध्ये साफसफाई करणारा इसम ताब्यात

पोलिसांच्या तपासादरम्यान एअर होस्टेसच्या हत्या प्रकरणात इमारतीमध्ये साफसफाईचं काम करणाऱ्या इसमाला पवई पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलीस त्याची चौकशी करत आहेत. चौकशीअंती हत्येचं मूळ कारण समोर येईल. बहिण आणि मित्रासोबत राहत होती, परंतु ते दोघे आठ दिवसांपूर्वी गावाला गेले होते. एअर होस्टेस रुपल ओग्रे घरात एकटीच असताना तिची हत्या करण्यात आली.

संबंधित तरुणीने तिच्या कुटुंबियांचे कॉल न उचलल्याने त्यांनी मुंबईतील त्यांच्या स्थानिक मित्रांशी संपर्क साधला आणि तरुणीची विचारणा करण्यास सांगितलं. जेव्हा तरुणीच्या कुटुंबियांचे मित्र तिथे गेले तेव्हा फ्लॅट आतून बंद असल्याचं आढळून आलं. त्यांनी बेल वाजवली असताना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी पवई पोलिसांना याबाबत कळवलं. त्यानंतर डुप्लिकेट चावीच्या मदतीने फ्लॅट उघडला. पोलीस आतमध्ये गेल्यानंतर या एअर हॉस्टेस गळा चिरलेल्या अवस्थेत आढळली. यानंतर तिला तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल नेण्यात आलं, तिथे तिला मृत घोषित करण्यात आलं. त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कुपर रुग्णालयात दाखल केला.

हेही वाचा

Air Hostess Death Case : चौथ्या मजल्यावरून पडून एअर होस्टेसचा मृत्यू, डेटिंग अॅपवरुन प्रेम झालेल्या प्रियकराने ढकलल्याचा आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma and Ritika Sajdeh Baby Boy : रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
Ravindra Waikar : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole : सत्तारांना पराभूत करण्यासाठी ठाकरेंची भाजपला साद!Ravindra Waikar Jogeshwari  Land Case : वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंदTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 16 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 16 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma and Ritika Sajdeh Baby Boy : रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
Ravindra Waikar : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
Embed widget