एक्स्प्लोर

Mumbai Crime : मुंबईत एअर होस्टेसची हत्या करणाऱ्या आरोपीची आत्महत्या, लॉकअपमध्ये पँटने गळफास घेतला

Mumbai Crime : मुंबईत एअर होस्टेसची हत्या करणाऱ्या आरोपीने अंधेरीमधील पोलीस स्टेशनच्या लॉक-अपमध्ये आत्महत्या केली आहे.

मुंबई : मुंबईत एअर होस्टेसची (Air Hostess) हत्या करणाऱ्या आरोपीने अंधेरीमधील पोलीस स्टेशनच्या (Andheri Police Station) लॉक-अपमध्ये आत्महत्या (Suicide) केली आहे. आरोपी विक्रम अटवाल याने पँटने गळफास लावून घेतल्याची घटना आज सकाळी 6.30 च्या सुमारास घडली. पवई इथे राहणाऱ्या रुपल आग्रे नावाच्या एअर होस्टेसच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी विक्रमला अटक करण्यात आली होती. तो पोलीस कोठडीत होता. तिथेच गळफास घेऊन त्याने आयुष्य संपवलं.

आरोपीचा मृतदेह जवळच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आला असून तिथे त्याचं शवविच्छेदन करण्यात येईल. दरम्यान एअर होस्टेसची हत्या करणारा विक्रम अटवाल हा त्याच बिल्डिंगमध्ये हाऊस किपिंगचं काम करत होता. दोन दिवसांपूर्वी त्याचा रुपलसोबत वाद झाला होता. यावादातूनच त्याने रुपलची हत्या केल्याची कबुली दिली. यानंतर त्याला अटक करुन पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. तर आज कोर्टात त्याला हजर केलं जाणार होतं. परंतु त्याआधीच आरोपीने गळफास घेतला.

काय आहे प्रकरण?

मुंबईत रविवारी (4 सप्टेंबर) 24 वर्षीय एअर होस्टेस रुपल ओग्रेची तिच्या राहत्या घरात  हत्या करण्यात आली होती. गळा चिरुन तिची हत्या झाली होती. या हत्या प्रकरणात पोलिसांनी 12 तासाच्या आत त्याच इमारतीत काम करणारा सफाई कामगाराला अटक करुन या गुन्ह्याचा छडा लावला. आरोपीही पवईचा रहिवासी आहे. त्याची पत्नीही इमारतीतील कचरा उचलण्याचे काम करते.

पवई पोलिसांनी या प्रकरणात विक्रम अटवाल याच्याविरोधात भादंवि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला. अटक केल्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आलं.  त्याची रवानगी अंधेरी पोलीस स्टेशनममध्ये करण्यात आली. इथे कोठडीत असताना त्याने पँटच्या सहाय्याने गळफास घेत आयुष्य संपवलं. 

अंधेरी पोलीस स्टेशनचं गेट बंद

दरम्यान, अंधेरी पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये आरोपीने आत्महत्या केल्यामुळे अंधेरी पोलीस स्टेशनचं गेट बंद करण्यात आलं आहे. अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये अतिरिक्त आयुक्त वेस्ट रीजन परमवीर सिंग दहिया आणि पोलीस उपायुक्त परिमंडळ 10 चे दत्ता नलावडे उपस्थित आहेत. आरोपीने आत्महत्या केल्यामुळे मुंबई पोलिसांच्या लॉकअपबाबतही सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबई पोलिसांचा लॉकअपमध्ये आरोपींसाठी मोठा सिक्युरिटी लेयर असतो. तरीही आरोपींने आत्महत्या केल्यामुळे तसंच अंधेरी पोलिसांनी पोलीस स्टेशन गेट बंद केल्यामुळे तक्रारदारांचा मोठे हाल होत आहेत.

संबंधित बातमी

Mumbai Crime : मुंबईत 23 वर्षीय एअर होस्टेस राहत्या घरी गळा चिरलेल्या अवस्थेत आढळली, इमारतीत सफाईचं काम करणारा इसम अटकेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Sanjay Nirupam on Ravindra Waykar : EVM Hack केलं असतं तर वायकर कमी लीडने जिंकले नसतेPraful Patel :  मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच? केंद्रीय मंत्रिपदावर प्रफुल पटेलांचा दावाTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 04 PMRavindra Waykar on EVM : ईव्हीएमसोबत छेडछाड केल्याचा प्रश्नच येत नाही, रवींद्र वायकरांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
Embed widget