Mumbai Crime : मुंबईसह भारतात 30 लाख बनावट सिमकार्ड, एका आरोपीकडून आपल्या फोटोवरुन तब्बल 685 सिम कार्ड जारी
Mumbai Crime : मुंबई पोलिसांनी शेकडो पोलिसांच्या मदतीने अशा लोकांना अटक केली आहे, जे एका फोटोचा वापर करुन हजारो सिमकार्ड जारी करत असत.
![Mumbai Crime : मुंबईसह भारतात 30 लाख बनावट सिमकार्ड, एका आरोपीकडून आपल्या फोटोवरुन तब्बल 685 सिम कार्ड जारी Mumbai Crime 30 lakh fake SIM cards in India including Mumbai 685 SIM cards issued by one accused from his photo Mumbai Crime : मुंबईसह भारतात 30 लाख बनावट सिमकार्ड, एका आरोपीकडून आपल्या फोटोवरुन तब्बल 685 सिम कार्ड जारी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/13/069c0337fd2284013639e469540e6a35168397420355383_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mumbai Crime : मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) शेकडो पोलिसांच्या मदतीने अशा लोकांना अटक केली आहे, जे एका फोटोचा वापर करुन हजारो सिमकार्ड (SIM Card) जारी करत असत. यानंतर हे सिमकार्ड बनावट कॉल सेंटर्स, बुकी किंवा इतर कोणतेही अवैध काम करणाऱ्या लोकांना वापरण्यात देत असत.
मुंबई पोलिसांचे सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था सत्यनारायण चौधरी यांनी सांगितलं की, दूरसंचार विभागाने (DOT) आमच्याशी एक माहिती शेअर केली होती की त्यांनी त्यांच्या सुपर कॉम्प्युटरच्या मदतीने संशयास्पद सिमकार्ड ओळख पटवली आहे. एकाच व्यक्तीचा वेगवेगळ्या अँगलमधून काढलेले फोटो वापरु शेकडो सिमकार्ड जारी करण्यात आली आहेत, ज्याचा वापर चुकीच्या लोकांकडूनही होऊ शकतो.
विविध पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्या पथकांकडून शोध
ही माहिती मिळाल्यानंतर मुंबईतील व्हीपी रोड पोलीस स्टेशन, डीबी मार्ग पोलीस स्टेशन, मलबार हिल पोलीस स्टेशन, सहार पोलीस स्टेशन आणि बांगूरनगर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची पथके तयार करण्यात आली आणि त्यानंतर डीओटीला मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ज्या ज्या ठिकाणांहून ही सिमकार्ड जारी करण्यात आली होती तिथे शोध घेतला.
पाच गुन्हे दाखल, 13 जणांना अटक
चौधरी पुढे म्हणाले की, "या संपूर्ण प्रकरणाच्या तपासादरम्यान आम्ही पाच गुन्हे नोंदवले आहेत आणि या प्रकरणांमध्ये 13 आरोपींना अटक देखील केली आहे. अधिक चौकशी आणि तपास केला असता, मुंबईतील 62 जणांनी स्वत:चे फोटो वापरुन एकूण 8500 सिमकार्ड जारी केल्याचे समोर आलं आहे."
या तपासादरम्यान, मुंबईला लागून असलेल्या मीरा रोड परिसरात सुरु असलेल्या बनावट कॉल सेंटरला एका व्यक्तीने काही सिमकार्ड दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानंतर पोलिसांनी त्या कॉल सेंटरवर छापा टाकला आणि तिथून 52 सिमकार्ड जप्त केली.
एका फोटोचा वापर करुन तब्बल 685 सिम कार्ड
व्हीपी रोड पोलिसांनी विशाल शिंदे नावाच्या आरोपीला अटक केली आहे, त्याचं वय 33 वर्षे असून, त्याने त्याचा फोटो वापरुन 378 सिमकार्ड जारी केले होते. डीबी मार्ग पोलिसांनी अब्दुल शेख नावाच्या व्यक्तीला अटक केली ज्याने त्याचा फोटो वापरुन 190 सिम कार्ड जारी केले. यातील मोठा खेळाडू ठरला तो मलबार हिल पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी. त्याचं नाव अब्दुल मन्सूरी असून त्याने त्याच्या फोटोचा वापर करुन तब्बल 685 सिम कार्ड जारी केले होते.
चौधरी म्हणाले की, आम्ही या प्रकरणाचा वेगवेगळ्या दृष्टीने तपास करत आहोत. DOT च्या माहितीनुसार, मुंबईत एकूण 30,000 सिमकार्ड आहेत जी बेकायदेशीरपणे जारी करण्यात आली होती. डीओटीच्या सूत्रांनी सांगितले की देशात अशाप्रकारे एकूण 30 लाख सिम कार्ड जारी करण्यात आले होते, जे डीओटीने थांबवले आहेत.
सूत्रांनी सांगितले की, या सिमकार्डचा वापर सायबर गुन्हेगार, बनावट कॉल सेंटर ऑपरेटर आणि क्रिकेट बुकी करतात.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)