(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bandra Incident | एबीपी माझाचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांना वांद्रे गर्दी प्रकरणी जामीन मंजूर
वांद्रे स्थानकाबाहेरील गर्दी प्रकरणावरुन एबीपी माझाचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी वांद्रे सत्र न्यायालयाने राहुल कुलकर्णी यांचा जामीन मंजूर केला आहे.
मुंबई : बांद्रा (वांद्रे) रेल्वे स्थानकाबाहेर मंगळवारी जमा झालेली गर्दी एबीपी माझाचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांच्या वार्तांकनामुळे झाल्याचा आरोप ठेवत त्यांना अटक करण्यात आली होती. वांद्रे सत्र न्यायालयाने राहुल कुलकर्णी यांचा जामीन मंजूर केला आहे. राहुल कलकर्णी यांच्या वार्तांकनामध्ये कोणत्याही स्टेशन अथवा वेळेचा उल्लेख नसल्याची गोष्टी कोर्टाने ग्राह्य धरली असल्याचा अंदाज आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर काल बुधवारी एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी एबीपी माझाची भूमिका मांडली आहे.
राहुल कुलकर्णी यांच्यावर आरोप लावून त्यांना अटक केल्यानंतर आघाडीचं वृत्तपत्र, राज्यातील ज्येष्ठ पत्रकार तसेच सोशल माध्यमावर अनेक सामान्य लोकही त्यांची अटक चुकीची असल्याचं सांगत त्यांच्या समर्थनार्थ उतरले आहेत.
#ISupportRahulKulkarni | राहुल कुलकर्णी यांची अटक चुकीची, मीडियातील दिग्गजांसह अनेकजण समर्थनार्थ
न्यायव्यवस्थेवर विश्वास : अविनाश पांडे (सीईओ एबीपी न्युज नेटवर्क) “जबाबदार पत्रकारिते’च्या समर्थनार्थ आमच्या बाजूने उभे राहिलेल्या प्रत्येक पत्रकाराचे मी आभारी आहे. आज, घराबाहेर जाऊन पत्रकार आपला जीव धोक्यात घालून सत्य माहिती लोकांपर्यंत पोहचवत आहे हे अविश्वसनीय आहे. एबीपी माझाचे रिपोर्टर राहुल गुरुग्रंथ कुलकर्णी, यांच्यावर अफवा आणि खोटी बातमी पसरवल्याचा आरोप ठेवून अटक करण्यात आली. त्यांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. पुन्हा एकदा आम्ही म्हणजे एबीपी माझा आपली भूमिका कायम ठेवत आहोत. आमची प्रतिष्ठा बिघडवण्याच्या कोणत्याही गोष्टींचा सामना करू. अहवाल बनावट बातम्यांवर आधारित आहेत हे निश्चितपणे अपमानकारक होते. तथापि, आम्हाला भारताच्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. बनावट बातम्या आणि चुकीच्या माहितीच्या या आरोपाविरोधात लढा देण्यासाठी आम्ही आमच्या क्षमतेनुसार सर्व काही करू. एबीपी माझा ही एक आदरणीय आणि जबाबदार वृत्तवाहिनी आहे. कोणत्याही बातमीची खात्री केल्याशिवाय आम्ही ती प्रसिद्ध करत नाही. राहुल कुलकर्णी जबाबदार पत्रकारितेपासून दूर गेले नाहीत. ते म्हणाले की, खर्या दोषींना समोर आणण्यासाठी आम्ही निःपक्षपातीपणे तपासणीस आमचा पूर्ण पाठिंबा देऊ” : अविनाश पांडे (सीईओ एबीपी न्युज नेटवर्क)एबीपी माझाची भूमिका बांद्रा (वांद्रे) रेल्वे स्थानकाबाहेर मंगळवारी आपापल्या गावी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार, मजुरांची गर्दी जमा झाली होती. ही गर्दी एबीपी माझाचे उस्मानाबादचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांच्या वार्तांकनामुळे झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपावरुन राहुल कुलकर्णी यांना अटक करण्यात आली होती. ज्या रेल्वेच्या पत्रावर दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले. त्याच काँग्रेसचे सरकार असलेल्या महाराष्ट्रात एबीपी माझाच्या पत्रकाराला अटक होणे, हे कितपत योग्य आहे? याचा विचार महाराष्ट्रातील सुज्ञ जनता आणि सरकार करेल, असा एबीपी माझाला विश्वास आहे.
BLOG | इगोच्या राजकारणात पत्रकाराला बळीचा बकरा बनवू नका!
कोरोनामुळे सध्या राज्य, देश आणि जग हे अत्यंत बिकट अवस्थेतून जात आहे. गेल्या 21 दिवासांपासून देशभरात लॉकडाऊन आहे. हा लॉकडाऊन काल म्हणजे 14 एप्रिलला संपणार होता. राज्यभरात अनेक ठिकाणी हजारो कामगार, मजूर अडकले आहेत. या संदर्भात माझाचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी बातमी केली होती. लॉकडाऊनमुळे हजारो कामगार सध्या बेरोजगार आहे. त्यामुळे या कामगारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक स्वयंसेवी संस्था आणि राजकीय लोक अशा मजूरांना जेवण पुरवत आहेत. मात्र, अनेकांपर्यंत या गोष्टी पोहचत नाहीय. परिणामी या कामगारांची उपासमार होत आहे.
#ISupportRahulKulkarni | वांद्रे सत्र न्यायालयाकडून एबीपी माझाचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांना जामीन