Coronavirus Updates : मुंबईत शुक्रवारी 38 नव्या रुग्णांची नोंद, 248 सक्रिय रुग्ण
Mumbai Coronavirus Update : मागील काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णांची(Mumbai Corona Update) संख्यामध्ये चढउतार पाहायला मिळत आहे.
Mumbai Coronavirus Update : मागील काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णांची(Mumbai Corona Update) संख्यामध्ये चढउतार पाहायला मिळत आहे. शुक्रवारी मुंबईत 38 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर गुरुवारी मुंबईत नव्या 54 रुग्णांची आज नोंद झाली होती. बुधवारी मुंबईत 46 बाधित रुग्ण आढळले होते. मुंबई महानगरपालिकेने (Mumbai BMC) दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी मुंबईत नवे 38 कोरोनाबाधित आढळले असून 47 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
मुंबई पालिका क्षेत्रात (BMC) आज एका कोरोना मृत्यूची नोंद झाली आहे. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या देखील 248 इतकी झाली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 98 टक्क्यांवर गेले आहे. आज नव्याने सापडलेल्या 38 रुग्णांपैकी फक्त एका रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेकडील 26 हजार 280 बेड्सपैकी केवळ 25 बेड सध्या वापरात आहेत.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) March 25, 2022
25th March, 6:00pm#NaToCorona pic.twitter.com/9jrEDPgxl5
राज्यातील कोरोना संसर्गाचा वेग मंदावला, शुक्रवारी 275 रुग्णांची नोंद
राज्यात सध्या 892 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.आज राज्यात 275 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या चोवीस तासात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 346 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,24, 560 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 7, 91, 56, 002 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
देशात सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट -
देशामध्ये जीवघेण्या कोरोना व्हायरस (Coronavirus)चा प्रादुर्भाव आता हळू हळू कमी होताना दिसत आहे. कालच्या तुलनेत आज कोरोनाचे आकडे कमी झाल्याचं दिसत आहे.मागील 24 तासात कोरोनाचे नवीन 1685 रुग्ण समोर आले आहेत तर 83 रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळं झाला आहे. काल देशात 1938 केसेस समोर आल्या होत्या तर 67 लोकांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल देशात 2 हजार 499 लोक कोरोनातून बरे झाले होते. त्यानंतर सक्रिय रुग्णांची संख्या 21 हजार 530 वर आली आहे. कोरोनामुळे आत्तापर्यंत 5 लाख 16 हजार 755 मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत देशात 4 कोटी 24 लाख 78 हजार 87 कोरोनातून संसर्गमुक्त झाले आहेत.