Mumbai Corona Update : मुंबईत गेल्या 24 तासात 315 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर तिघांचा मृत्यू
Mumbai Corona Update : मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या 3849 इतकी असून रुग्ण दुपटीचा दर 1567 दिवसांवर पोहोचला आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने कमी होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात मुंबईमध्ये 315 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 429 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,33,318 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रिकव्हरी रेट हा 97 टक्के इतका झाला आहे.
मुंबईत 3849 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर हा 1567 दिवसांवर पोहोचला आहे. सील केलेल्या इमारतींची संख्या 35 इतकी असून सध्या मुंबईत एकही कंटेनमेंट झोन नाही. मुंबई महानगरपालिकेनं दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील कोरोनाचा साप्ताहिक ग्रोथ रेट कमी होऊन ०.०4 टक्केंवर आला आहे.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) October 31, 2021
३१ ऑक्टोबर, संध्या. ६:०० वाजता
२४ तासात बाधित रुग्ण-३१५
२४ तासात बरे झालेले रुग्ण-४२९
बरे झालेले एकूण रुग्ण-७३३३१८
बरे झालेल्या रुग्णांचा दर-९७%
एकूण सक्रिय रुग्ण-३८४९
दुप्पटीचा दर-१५६७ दिवस
कोविड वाढीचा दर (२४ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर)-०.०४%#NaToCorona
मुंबईतील 10 हजार सोसायट्या 'फुल्ली वॅक्सिनेटेड'
मुंबईतील 10 हजार सोसायट्या लसवंत (Fully Vaccinated) झाल्या असून 10 हजार इमारतीतील रहिवाशांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. या इमारतींवर महापालिकेकडून विशेष लोगो लावला जातोय. मुंबईतील 100 टक्के लसीकरण झालेल्या इमारतींवर 'फुल्ली वॅक्सिनेटेड' असा लोगो लावण्यात येणार आहे. येत्या जानेवारीपर्यंत संपूर्ण मुंबई लसवंत होणार असल्याचा सत्ताधारी शिवसेनेचा दावा आहे. अशातच मुंबईत एकूण 37 हजार इमारती आहेत. त्यापैकी 22 हजार इमारतींच्या सोसायट्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 10 हजार इमारती संपूर्ण लसवंत झाल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या (BMC) वतीनं देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या :