Mumbai Corona Cases : मुंबईकरांना दिलासा; मुंबईत शनिवारी 146 रुग्णांची नोंद, 209 कोरोनामुक्त
Mumbai corona cases : राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईमध्ये 1,154 सक्रिय रुग्ण आहेत.
Mumbai Corona Cases : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना (Corona) रुग्णसंख्येत चढ-उतार होताना दिसत आहे. कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रासह मुंबईत कमी होताना दिसत आहे. मुंबईत आज 146 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांना आता दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होतानाचे चित्र पाहायला मिळत आहे.
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत शनिवारी 209 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,28,068 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 98.2 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत एकाही रुग्णाचा कोरोनामुळे झाला नाही. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19,723 झाली आहे. सध्या मुंबईत 1,154 रुग्ण आहेत. दरम्यान मुंबईत आढळलेल्या नव्या 146 रुग्णांमध्ये 141 रुग्णांना अधिक लक्षणं नसल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे. रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगाने वाढत आहे. रुग्ण दुपटीचा दर 4650 दिवसांवर गेला आहे.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) September 17, 2022
17th September, 6:00pm#NaToCorona pic.twitter.com/jehTGHcqlp
सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत
राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 1154 सक्रिय रुग्ण आहेत. तर पुण्यात 1161 सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात 812 सक्रिय रुग्ण आहेत. पालघर 110, रायगड 258, रत्नागिरी 87, सिंधुदुर्ग 57, सातारा 58, सांगली 44, कोल्हापूर 70, सोलापूर 30, नाशिक 152, अहमदनगर 69, औरंगाबाद 26, जालना 26, लातूर 59, उस्मानाबाद 65, अकोला 31, वाशिम 28, बुलढाणा 13, नागपूर 116, भंडारा 11, गडचिरोली 17 आणि चंद्रपूरमध्ये 31 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रिय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 4,562 सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात आज 631 कोरोना रुग्णांची नोंद
राज्यात आज 631 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 789 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबई जिल्ह्यातील आहे.
संबंधित बातम्या